आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइंडफुलनेस : जगण्याचा मंत्र देणाऱ्या गुरूचा नवीन प्रवास; व्हिएतनामी बौद्ध संन्यासी पश्चिमेकडून स्वत:च्या देशात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्यू, व्हिएतनाम- व्हिएतनामची राजधानी राहिलेल्या ह्यू शहरात एक बौद्ध मठ आहे. या मठात राहणारे ९२ वर्षीय बौद्ध महंत थिच न्हाट हान कोणाला काहीच न सांगता एका नवीन प्रवासाला निघाले आहेत. २०१४ मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर त्यांनी औषधी घेणे बंद केले. आपल्या बंगल्यात जीवनातून मुक्त होण्याची प्रतीक्षा ते करू लागले. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी व्हिएतनाममध्ये पोहोचल्यावर व्हीलचेअरवर अनेकांना ते दिसले. त्यांना क्षणभर पाहण्यासाठी अनेक जण आतुर असतात. कम्युनिस्टांविरुद्ध युद्धाचे समर्थन करताना दक्षिण व्हिएतनामच्या सरकारने त्यांना देशद्रोही घोषित केले. त्यानंतर त्यांनी देश सोडला होता. 

 

पाश्चिमात्य देशांत न्हाट हान यांना एकाग्रता, ध्यान, सचेतनाचा पितामह म्हणतात. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की, एकाग्रतेने संत्रा सोलणे व चहा प्यायल्यामुळे आम्ही बोधिसत्व प्राप्त करू शकतो. आपल्या एका पुस्तकात 'युवर ट्रू होम'मध्ये ते म्हणतात, 'बुद्ध तो आहे जो प्रबुद्ध आहेे. प्रेम करू शकतो. क्षमा करू शकतो. अनेक वेळा तुम्ही असेच असता. यामुळे बुद्ध होण्याचा आनंद घ्या.' हान यांनी ७० पुस्तके लिहिली आहेत. त्याचे ३० भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. अनेक देशांमध्ये त्याचा प्रभाव आहे. हवामान बदलावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या कन्व्हेन्शनच्या एक्झिक्युटिव्ह सचिव क्रिस्टिएना फिगुएरेस म्हणतात, जर न्हाट हान यांचा विचारांवर अंमलबजावणी केली नाही तर पॅरिस करार होऊ शकत नाही. हान यांचे 'मिरॅकल ऑफ माइंडफुलनेस' या पुस्तकाला जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम आपले सर्वाधिक आवडते पुस्तक म्हणतात. हान आपल्या जीवनाचा शेवट करण्यासाठी व्हिएतनाममध्ये आलेले आहेत, असा संदेश शिष्यांसाठी समजला जात आहे. 


अनेक धर्मगुरूंवर कम्युनिस्ट शासनाकडून अत्याचार झाले. बुद्धिस्ट चर्च व्हिएतनामचे प्रमुख थिच क्वांग डो यांनी अनेक वर्षे कारागृहात घालवली. चर्चचे पॅरिसमधील प्रवक्ते वो वॉन एई म्हणतात, जुन्या काळात हान यांचा व्हिएतनाम प्रवास सरकारसाठी एखाद्या खेळण्याप्रमाणे होता. यामुळे त्याच्या पुनगरामनाला व्हिएतनाममध्ये खूप महत्त्व दिले गेले. हान यांनी नेहमी आपला मार्ग स्वत:च निवडला. १९६१ ते १९६३ मध्ये कोलंबिया व प्रिन्स्टन विद्यापीठात बौद्धवादाचे शिक्षण त्यांनी दिले. त्यानंतर युद्धविरोधी कार्यकर्ता म्हणून ते व्हिएतनाममध्ये परत आले. १९६७ मध्ये मार्टिन लुथर किंग यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवले. शेवटी दक्षिण पश्चिम फ्रान्समधील प्लम गावातील बौद्ध मठास आपले मुख्यालय बनवले. त्यांनी अमेरिका, थायलंडसह अन्य ८ ठिकाणी बौद्ध मठांची स्थापना केली. -सोबत सुप्रिया बत्रा/हाँगकाँग, ब्रायन वाल्श/ न्यूयॉर्क 


एक अब्ज डॉलरचा उद्योग, २४५० केंद्रे 
हान यांनी ज्या माइंडफुलनेसचा प्रसार केला. आज तो अमेरिकेतील एक अब्ज डॉलरचा उद्योग बनला आहे. येथे २४५० ध्यान केंद्रे आहेत. हजारो पुस्तके, अॅप्स व ऑनलाइन कोर्स सुरू आहे. एका पाहणीत दिसून आले की, ३५ टक्के कंपन्यांमध्ये माइंडफुलनेसला कामकाजाच्या ठिकाणी स्थान दिले आहे. जगात अनेक रुग्णालयांत तणाव कमी करण्यासाठी याचा वापर करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...