आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः टीव्ही शोज होस्ट आणि अॅक्ट्रेस मिनी माथुर आज (मंगळवार) आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 21 ऑगस्ट 1976 रोजी दिल्लीत मिनीचा जन्म झाला. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानसोबत मिनी माथूर विवाहबद्ध झाली आहे. मनी आणि कबीर यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. मिनीचे कबीरसोबत अफेअर असतानाच्या काळात तिने कबीरची भेट तिच्या वडिलांशी घालून दिली होती. पण या भेटीत मिनीने कबीरच्या आडनावाचा उलगडा वडिलांसमोर केला नव्हता. या रहस्यावरुन वर्षभराने पडदा उचलला गेला.
मिनीने स्वतः सांगितला होता हा किस्सा...
- मिनीने एका एंटरटेन्मेंट साइटला दिलेल्या मुलाखतीत आपली लव्ह स्टोरी शेअर केली होती. तिने सांगितले की, मी अभिनय क्षेत्रात करिअर करावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा नव्हती. जेव्हा मी 'तोलमोल के बोल' हा शो साडी परिधान करुन होस्ट केला, तेव्हा त्यांनी या इंडस्ट्रीत येण्यासाठी मला परवानगी दिली होती.
- मिनीने सांगितले होते की, तिचे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. त्यांच्या मुलीचे लग्न माथूर कम्युनिटी किंवा एखाद्या बँकर, इंजिनिअरशी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.
- सुरुवातीला मिनीने लग्नासाठी बरेच तरुण बघितले, पण तिला कुणीही पसंत पडलं नाही. मग तिची भेट मुस्लिम असलेल्या कबीर खानसोबत झाली.
प्लानिंग करुन कबीरसोबत घालून दिली होती वडिलांची भेट...
कबीर खान मुस्लिम आहे, त्यामुळे लग्नासाठी वडिलांकडून सहजासहजी परवानगी मिळणार नाही, हे मिनीला ठाऊक होते. म्हणून तिने कबीरची भेट मित्र म्हणून वडिलांशी घालून दिली होती. पण यावेळी तिने कबीरच्या आडनावाचा उल्लेख करणे टाळले. हळूहळू कबीर आणि मिनीच्या वडिलांमध्ये मैत्री झाली. यासाठी वर्षभराचा काळ जलागला. मिनीने कबीरला तिच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घालण्यासाठी सांगितले आणि कबीरने वडिलांना त्याच्या आडनावाचे सत्य सांगितले. याकाळात कबीर मिनीच्या वडिलांना आवडू लागला होता. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला नाही. आता कबीर आणि मिनी यांना विवान हा एक मुलगा आणि सन्या ही एक मुलगी आहे.
- मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतरही आडनाव न बदलल्याने मिनी माथूर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.