आरोग्य / सोप्या पद्धतीने डोळ्यांची सूज कमी करा

बऱ्याच वेळेस झोप पूर्ण न झाल्याने, खूप जास्त थकल्याने डोळ्यांवर सूज येते

दिव्य मराठी

Feb 13,2020 12:10:00 AM IST

बऱ्याच वेळेस झोप पूर्ण न झाल्याने, खूप जास्त थकल्याने डोळ्यांवर सूज येते. ही समस्या दूर करण्यासाठी या दोन पद्धतीचा अवलंब करा......


1. बर्फाचा तुकडा : एका सुती रुमालावर बर्फाचे काही तुकडे घेऊन हलक्या हाताने डोळ्यांवर चोळा आणि जर बर्फाचा थंडपणा सहन होत असेल तर थोडावेळ बर्फ डोळ्यांवर ठेवा. यामुळे २ ते ३ मिनिटांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि याप्रमाणेच थंड दुधात बुडवलेला कापसाचा बोळा ५ ते १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.


2. टी बॅग्ज : टी बॅग्जचा उपयोग डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी होतो. यासाठी एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात दोन टी बॅग्स ठेवा. पाणी ठंड झाल्यावर टी बॅग्स पाण्यातून काढून ३ ते ४ मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवा. यानंतर या बॅग फ्रिजमध्येदेखील ठेवू शकता. डोळ्यांसोबत हे त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर होऊ शकते.

X