सावंतवाडीत मायनिंगची चार / सावंतवाडीत मायनिंगची चार कोटींची फसवणूक

May 28,2011 05:05:56 PM IST

सावंतवाडी - मायनिंग वाहतूक कळणे-बांदा रेडी अशी होत असताना १५ जानेवारीपासून १७ मेपर्यंत ३५ डंपर्समधून मायनिंग परस्पर लंपास केले. त्याची ४ कोटी इतकी किंमत होईल, अशी तक्रार ठेकेदार दत्ताराम कवठणकर यांनी पोलिसांत केली.

गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरलेल्या मायनिंग हेराफेरीची पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
कळणे येथील मिनरल्स अ‍ॅण्ड मेटल या धुळे येथील विनय पाटील यांच्या मायनिंग कंपनीचा वाहतूक ठेकेदार दत्ताराम गजानन कवठणकर यांनी दोघांविरोधात पोलिसात तक्रार दिली.

रेडी बंदराकडे वाहतूक करणारे अधिकारी सुहास लक्ष्मण हळदणकर व माने यांनी परस्पर मायनिंग लंपास केल्याप्रकरणी दत्ताराम कवठणकर यांच्या तक्रारीनुसार कलम ४०८, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

X