आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या आरोपाखाली मिनी रत्नी कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी कडाक्याच्या थंडीत घेतली 12 तरुणांची नेकेड परेड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भंडारा येथील केंद्र सरकारच्या 'मिनी रत्नी’ कंपनीच्या  सुरक्षारक्षकांनी चोरीचा आरोप असलेल्या 12 तरुणांची कडाक्याच्या थंडीत नेकेड परेड (विवस्र धिंड) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅग्नीझ ओर इंडिया लिमिडेटच्या परिसरात सुरक्षारक्षकांनी पीडित तरुणांना अर्धनग्न करून फिरवले.

 

ही घटना 3 जानेवारीला घडली होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

 

भंडारा पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुण कोण? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. नंतर त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. तरुणांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...