Home | Maharashtra | Pune | Minister Badole announce help for inter cast marriage

आंतरजातीय विवाहास अडीच लाखांची मदत देणार : मंत्री राजकुमार बडोले

प्रतिनिधी | Update - Jan 04, 2019, 12:07 PM IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

  • Minister Badole announce help for inter cast marriage

    पुणे- जातिव्यवस्थेविरोधात समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला यापुढे अडीच लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

    ते म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्था तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा प्रभावी उपाय सुचवला. पण, त्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसत नाही. यातील पहिला सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळा फेब्रुवारीत घेण्यात येईल. या सोहळ्यात संबंधित जोडप्याने विवाह करावा. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला तर ऑनर किलिंगसारख्या घटनांपासून त्यांच्या अपत्यांना संरक्षण, पोलिस मदत अशा बाबींचा समावेश कायद्यात करणार आहोत. भावी काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, त्यांच्या अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस आहे. यासंबंधीच्या कायद्याचा मसुदाही तयार असल्याचे ते या वेळी म्हणाले.

Trending