आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीत उत्साहात स्वागत, स्वागतासाठी उभारली 75 लाखांचे सोने जडलेली कमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी : सामाजिक व न्याय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे मातृभूमी परळीत शुक्रवारी रात्री आगमन झाले. त्यांच्या जीवनात सोनेरी दिवस यावेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी शहरातील सुवर्णकार समाजाने एकत्रित येत राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात सोने, चांदीचे दागिने जडलेली कमान उभारली. या कमानीत १ किलो ९०० ग्रॅम वजनाचे सुवर्ण अलंकार आहेत. परळीकरांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने मंत्री मुंडे यांचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी अशा प्रकारचे चार किलो सोन्याच्या दागिन्यांची कमान उभारण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना सुवर्णजडीत कमानीच्या स्वागताचा मान मिळाला आहे.

शुक्रवारी धनंजय मुंडे परळी शहरात प्रथमच दाखल झाले. गोपीनाथगडावर जावुन त्यांनी गोपीनाथराव मुंडे, वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पांगरीपासून परळीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत केले. शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसायाला साजेशा स्वागत कमानी उभारल्या होत्या. मुंडे यांच्या स्वागतासाठी शिवाजी चौक, बाजार समिती, भवानी नगर, सुभाष चौक, बाळकृष्ण रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मार्गावर विद्युत रोषणाई केली. कापड व्यापाऱ्यांनी कापड, किराणा व्यापाऱ्यांनी किराणाा,रसवंती चालकांनी ऊस व विविध फळांच्या कमानी उभारून स्वागत केले. सुवर्णकारांनी राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात ७५ लाख रूपये किमतीच्या एक किलो नऊशे ग्रॅम सोने चादींचे दागिने असलेली कमान उभारली.विजयी मिरवणूकीत मध्य प्रदेश, राजस्थान, कोल्हापूर येथून बँड पथक, झांज पथक, कला पथकांना पाचारण करण्यात आले होते.

बाळासाहेबांसाठीही उभारली होती कमान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परळीत १९८९ मध्ये आगमन झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही चार किलो सोन्याचे दागिने असलेली कमान अश्याच पद्धतीने उभा करून स्वागत केले होते. अशी माहिती सुवर्णकार सुरेश टाक यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
मुंडेंच्या स्वागतासाठी परळीत सुवर्णजडित स्वागत कमान उभारण्यात आली.

धनंजय मुंडेंच्या जीवनात सोनेरी दिवस यावेत अशी अपेक्षा

भूमिपुत्र धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री झाल्यानंतर शहरात पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याचा शहरातील सर्व सुवर्णकार समाजाने निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वच समाज बांधवांनी आपापल्या दुकानातून दागिने आणून चार तासात हे काम आम्ही उभा केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या जीवनात असेच सोनेरी दिवस येवो म्हणून आम्ही सुवर्ण जडीत कमान उभा करून त्यांचे स्वागत केले आहे. -सुरेश टाक, सुवर्णकार परळी
 

बातम्या आणखी आहेत...