आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Minister For Social Justice And Special Assistance Dhananjay Munde To Set Up An Independent Information Room In The Ministry For The Deaf People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्णबधिरांसाठी मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 'विद्यार्थ्यांसाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल'

मुंबई- राज्यातील कर्णबधिरांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाने त्यांच्यासाठी घेतलल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांसह मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली. ज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन संघटनेच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.


यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शाळांचा दर्जा वाढविणार. कर्णबधिर विद्यार्थ्यांकरीता आयटीआयच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाशी चर्चा करुन निर्णय घेऊ. सांकेतिक भाषेचा डिग्री कोर्स सुरु करण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगाच्या संबंधित निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय याच्याप्रती कर्णबधिर शाळा व कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठविण्यात येतील. कर्णबधिरांच्या शाळेत प्रशिक्षीत शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असून कर्णबधिरांसाठी भौतिक सुविधासह शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, समाज कल्याण आयुक्त प्रविण दराडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.