आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता, भाजपचे 'संकट मोचक' होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागून आहे. पण, जळगावमध्ये वेगलेच चित्र पाहायला मिळाले आहे. येथील लोकांमध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरातील अनेक ठिकाणी "महाराष्ट्राचे लोकनेते आणि भावी मुख्यमंत्री" अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.


लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही मुख्यमंत्री पदावरून चोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण पुढे करत आपल्याला मंत्रिपदाची जबाबदारी नको, असल्याचे पत्र मोदींना दिले आहे. त्यामुळे मोदींच्या जवळचे मानले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्या जागी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता गृहीत धरून महाजन समर्थकांनी शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले आहेत. या विषयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.