आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘दिव्य मराठी’साठी लाइव्ह...मंत्री गिरीश महाजन... थेट केरळमधून
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या तीन पथकांनी मंगळवारपासून त्रिचुड, अर्नाकुल्लम व पट्टनीपट्टम या पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष मदतकार्य सुरू केले. माझ्यासह (गिरीश महाजन) डाॅक्टर, स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक मल्लम, अारमुला, चेल्लूर अाणि जवळच्या दाेन ते तीन छाेट्या गावांत गेले. चेल्लूर येथे पुराचा माेठा तडाखा बसला असून अद्यापही येथे अनेक बंगल्यांत कमरेइतके पाणी अाहे. पाऊस थांबला असला तरी पाण्याचा अपेक्षित निचरा झालेला नाही. चेल्लूरला अनेक मराठी कुटुंबे राहतात, अाम्ही त्यांच्याही घरी भेट दिली. त्यांनी महाप्रलयाचा जाे ‘अाँखाें देखा हाल’ सांगितला तो सुन्न करणारा हाेता. घरात राहून स्वत:चा बचाव करायचा की बाहेर पडून, असाच प्रश्न या लाेकांसमाेर हाेता. घरातील एकही वस्तू या तडाख्यातून सुटलेली नाही. त्यामुळे पाऊस थांबला असला तरी पूरग्रस्तांसमाेर अापल्या घरात पुन्हा जाऊन अाश्रय घेण्याचा पर्याय राहिलेला नाही. उंचवट्यावरील शाळा, महाविद्यालये, मेडिकल काॅलेज यांना अाता अाैषध व उपचारांबराेबरच ‘राेटी, कपडा अाैर मकान’अशी भूमिका बजावावी लागत अाहे.
पाऊस नसेल तेव्हा घरातील चिखल उपसून सफाई करण्याचे काम लाेक दिवसा करत अाहेत. रात्री निवाऱ्यासाठी पुन्हा कॅम्पमध्ये परतत अाहे. पुराच्या तडाख्याने सर्व हाेत्याचे नव्हते झाले असले तरी लाेक अाता गरीब-श्रीमंत असा भेद विसरून खांद्याला खांदा भिडवून मदतकार्यात जुंपले अाहेत. सध्या डाेकेदुखी, ताप, सर्दी, पडसे अशा अाजाराचे रुग्ण वाढू लागले अाहेत. अाैषधांचा साठा कमी हाेत असून बंगळुरूहून अाैषधसाठा मागवला अाहे. महाराष्ट्रापेक्षा येथून मदत मिळणे जवळ असल्यामुळे ताे मार्ग वापरला जात अाहे. याशिवाय, महाराष्ट्रातून अाणखी डाॅक्टरांची कुमक मागावयाची की नाही याबाबत उद्या परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल.
डाळ-भात अाणि बायराेड मदतकार्य
महाराष्ट्रातून दाखल झालेल्या पथकाला केरळ राज्य शासनाने महत्त्वाच्या सुविधा देऊ केल्या. मात्र, सर्वांनी कॅम्पमध्ये मुक्काम व तेथीलच डाळ-भातावर भुक भागवणे पसंत केेले. अगदी रस्त्यावरील पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बायराेडपेक्षा हेलिकाॅप्टरद्वारे जाण्याची व्यवस्थाही अामच्या पथकाला उपलब्ध हाेती, मात्र रस्त्यावरून जाऊन मदतकार्य करणे साेपे असल्यामुळे ताे मार्ग अाम्ही निवडला.
बाहुबलीतील ‘त्या’ सीनची अाठवण
चेल्लूरमध्ये या संकटाची अापबीती सांगताना लाेकांच्या चेहऱ्यावरील भय किंचितही कमी झालेले नव्हते. गळ्यापर्यंत पाणी अाल्यानंतर कमरेवरील लहान मुलांना डाेक्यावर बसवून बचावाचा प्रयत्न झाला. कित्येक तास लाेक अशाच पद्धतीने पाण्यात उभे हाेते. ‘बाहुबली’ या चित्रपटात ज्या पद्धतीने राजमाता नदीच्या प्रवाहात डाेक्यावर घेऊन मुलाचे रक्षण करते अशाच पद्धतीने लाेकांनी जिवाची बाजी लावून घरातील लहानग्यांना
वाचवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.