आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘दिव्य मराठी’साठी लाइव्ह... मंत्री गिरीश महाजन...थेट केरळमधून...
केरळमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी महाराष्ट्रातून मी स्वत: व १०० डाॅक्टरांचे पथक साेमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्रिवेंद्रममध्ये दाखल झालाे. भारतीय वायुदलाच्या दोन विमानांमधून या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत एकूणच परिस्थितीबाबत अाम्ही प्राथमिक चर्चा केली. बचावकार्य व पुनर्वसनासाठी नेमकी कोठे गरज आहे हे अाम्ही त्यांच्याकडून समजून घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही आता साधारण ३३ जणांचे एक याप्रमाणे तीन पथके तयार केली आहेत. त्यात डॉक्टरांसह वैद्यकीय मदतीशी निगडित विविध तंत्रज्ञांचा समावेश आहे. पट्टनपित्तम, त्रिचूड व अर्णकुलम या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांच्या बचावासाठी माेहीम रावबली जाईल. मंगळवारी सकाळी सात वाजता निघून आमची पथके नियोजित ठिकाणी पोहाेचतील. साेमवारी पोहोचण्यासाठी सायंकाळ झाल्यामुळे नेमक्या परिस्थितीबाबत जास्त माहिती घेता आली नाही. मात्र, जाताना रस्त्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या खुणा पाहायला मिळाल्या. अनेक गावांमध्ये अद्यापही पूरपरिस्थिती दिसून अाली.
सर्वात महत्त्वाचे अनेक गावात तर घराघरात पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना आसरा घेण्यासाठी जागाच उरलेली नाही. उंच भागात दाटीवाटीने दहा- दहा हजार माणसे एकत्र रहात आहेत. त्यांना झोपण्यासाठी जागा नाही, अन्नाचा प्रश्न आहे. घालण्यासाठी कपडे नाही. दिलासादायक बाब एवढीच म्हणावी लागेल की, अाता पावसाने विश्रांती घेतली आहे. पुराचे पाणीही ओसरू लागले आहे. मात्र अाता सर्वात माेठे संकट असेल ते साथीच्या आजारांचे आहे. या संकटाशी लढण्यास अाम्ही सज्ज अाहाेत. महाराष्ट्रातून अाम्ही मोठ्या प्रमाणामध्ये औषधसाठा इथे आणला आहे. गरज पडली तर अजून शंभर डॉक्टर व तंत्रज्ञांचे पथक प्रतीक्षा यादीमध्ये सज्ज् ठेवले अाहे. भारतीय लष्कर व वायूदलाने आणखी दोन विमाने देण्याची तयारी दाखवली आहे. परिस्थिती बघून या पथकालाही गरज असलेल्या भागांमध्ये तातडीने पाचारण करण्याचा निर्णय घेतला जाईल. सकाळीच नेमकी परिस्थिती लक्षात येईल व त्यानंतरच नेमके ऑपरेशन सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.