आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकरांच्या एका प्रश्नावर भडकले मंत्री महादेव जानकर, म्हणाले- तुम्ही मूर्ख आहात काय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - मुख्यमंत्र्यानी सांगितल्यास कमळाच्या चिन्हावर आपण निवडणुक लढवाल का? असा प्रश्न माढ्यातील पत्रकारांनी विचारताच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर भडकले. "किती वेळा हा प्रश्न पत्रकार मला विचारत आहेत. तुम्ही मूर्ख आहात काय? असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर आगपाखड व्यक्त केली. जानकर यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या या आक्षेपार्ह विधानावर पत्रकारांमधून निषेध व्यक्त केला जात आहे.

माढा शहरातील शासनमान्य शिवलाल रामचंद वाचनालयास शनिवारी पशु संवर्धन मंत्री जानकर यांनी भेट दिली. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र, प्राणी मित्र विलास शहा यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या भाजप-शिवसेना पक्ष प्रवेशांवर बोलताना ते म्हणाले, की पक्ष वाढीच्या दृष्टीने जो तो पक्ष प्रयत्न करत आहे. ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, त्या ठिकाणी याचा मोठा फायदा होईल. राज्यात आणि केंद्रातही युतीचे सरकार असल्याने पक्ष प्रवेशाचे वारे असेच सुरू राहील.

मंत्री पद मिळाले धनगर आरक्षणाचे काय असे विचारले असता, धनगरांना आरक्षण मिळाले असे अजब वक्तव्य करत आदिवासींच्या योजना देखील लागू झाल्या असे ते म्हणाले. मुळात आदिवासी समाजाच्या 22 योजनांमध्ये धनगरांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने एक हजार कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. परंतु, अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे, याचा लाभ धनगर समाजाला मिळालेला नाही. त्यातच, धनगर आरक्षण जाहीर झालेले नसताना जानकरांनी  धनगरांना आरक्षण मिळाल्याचे म्हटले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...