गोव्याचे मंत्री खुंटे म्हणाले, मुले अभ्यास सोडून पबजी खेळतात
म्हटले, प्रत्येक घराला या गेमच्या राक्षसाचा विळखा
-
पणजी- गोव्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खुंटे यांनी राज्यात ऑनलाइन गेम पबजीवर बंदी घालण्याचा कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. या गेमने प्रत्येक घरात राक्षसासारखा विळखा घातला असल्याचे म्हटले आहे.अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुले पबजी गेम खेळत असतात. अन्य राज्यांत यावर बंदी घालण्यात आली किंवा नाही याची मला कल्पना नाही. परंतु गोव्यात या गेमवर बंदी असणे आवश्यक बनले आहे. यासाठी कायदाही हवा. या मुद्द्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे जानेवारी महिन्यात गुजरातच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी करून प्राथमिक शाळांमध्ये पबजी गेमवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. अनेक युजर्सना एकाच वेळी खेळण्याची सुविधा देणाऱ्या ऑनलाइन गेम प्लेअर अननोन्स बॅटल ग्राउंड्सचा शॉर्टफॉर्म पबजी असा आहे. ऑनलाइन गेमिंग मार्केटमध्ये बेस्ट सेलर झालेला हा गेम साऊथ कोरियातील एका कंपनीने तयार केलेला आहे.