Home | National | Other State | Minister of PA, two children killed in an accident:was returning from trichi to Chennai

मंत्र्याचा पीए, दोन मुले अपघातात ठार: त्रिची येथून परतत होते चेन्नईला

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 09:08 AM IST

अपघातात जखमी एका व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • Minister of PA, two children killed in an accident:was returning from trichi to Chennai

    चेन्नई - तामिळनाडूचे मत्स्यपालनमंत्री डी. जयकुमार यांचे अतिरिक्त खासगी सचिव लोकनाथन आणि त्यांच्या दोन मुलांचा कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पुर गावाजवळ बुधवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. हे तिघे त्रिची येथून चेन्नईला परतत होते. रस्त्यात त्यांची कार एका बसवर धडकली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात जखमी एका व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    मुख्यमंत्री पलानीस्वामी यांंनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. जखमीवर चांगले उपचार करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

Trending