आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री बच्चू कडूंचा कामचुकार अधिकाऱ्यांना दणका, लाभार्थ्यांचे काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बच्चू कडूंच्या आदेशानंतर तहसीलदारांनी कारवाई करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला

अमरावती- महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांना दणाका दिला आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तहसील येथे आज दुपारी तीनच्या सुमारास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तहसील अचानक भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. 



यावेळी बच्चू कडूंनी तहसीलदारांना तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले. या आढावा बैठकीमध्ये तहसील कार्यालयांतर्गत रखडलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली. या बैठकीदरम्यान संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग या दोन विषयांवर एक तास चर्चा चालली. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागात संदर्भात वारंवार चकरा मारूनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यानंतर तात्काळ राज्यमंत्र्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील सपना भोवते निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभागातील प्रमोद काळे, या दोन्ही कामचुकार अधिकारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.