आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली - चळवळीत काम करत असताना अनेक चढ उतार पाहिले. शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने करून त्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला. मागील ५० ते ६० वर्षांपासून शेतकऱ्याचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सभागृहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देण्यासंदर्भात चर्चा करत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत होईल, त्यावेळी राज्यात होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या शिवाय राहणार नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता असून शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार आहे. असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
विनायक सरनाईक यांची डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांंचा शेलगाव जहांगीर गावकऱ्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ .शशिकांत खेडेकर, प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, विदर्भध्यक्ष प्रशांत ढोरे, रासपचे सुभाष राजपूत, संतोष राजपूत, संदीप मुळे, दीपक सुरडकर, तुषार काचकुरे, अनिल चौहान, सचिन पडघान, नितीन लोखंडे, विलास तायडे, रविराज टाले, सतीश देशमुख, योगेश राजपूत, सरपंच मनीषा ठेंग, उपसरपंच नंदकिशोर सरनाईक, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास ठेंग, जपे मामा, संतोष भुतेकर, अशोक पाटील, कांचन मुठाळ, अर्चना शिंगणे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने स्वामीनाथन आयोग लागू करण्याची शिफारस करून शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी निर्माण केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आपण उभी केलेली चळवळ कुठल्याही परिस्थितीत चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. फाटक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामोरे जाईल आणि निवडणुक कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर खोत यांच्या हस्ते विनायक सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम जाधव यांनी तर आभार प्रदर्शन रोहन गिरणारे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.