Home | Maharashtra | Pune | Minister of State for External Affairs V K Singh's taunts to opponents

...तर विरोधकांना तोंड दाखवणेही मुश्कील; परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांचा विरोधकांना टोला 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:26 AM IST

सिंग म्हणाले, सध्या विरोधकांनी रफालवरून रान उठवले. परंतु रफालसारखी लढाऊ विमाने आपल्या संरक्षण खात्यात येणे गरजेचे होते.

  • Minister of State for External Affairs V K Singh's taunts to opponents

    पुणे- संरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. रफालविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या कार्यकाळातील गोष्टी उघड केल्यास तोंडही दाखवता येणार नाही, असा टोला माजी लष्करप्रमुख व केंद्रीय परराष्ट्र धोरण राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे.

    पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंग म्हणाले, सध्या विरोधकांनी रफालवरून रान उठवले आहे. परंतु रफालसारखी लढाऊ विमाने आपल्या संरक्षण खात्यात येणे गरजेचे होते. कारण हवाई दलास आवश्यक असलेली क्षमता कमी झाली होती. आघाडी सरकारच्या काळात १२६ विमानांचा करार शेवटच्या क्षणी रद्द झाला. त्यानंतर मोदी सरकारने आधीपेक्षा जास्त क्षमतेची नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी ३६ विमाने मिळवली. नेमके काेणते तंत्रज्ञान लढाऊ विमानात हवे यावर त्या विमानाची किंमत ठरत असते, मात्र केवळ अर्धवट माहितीवर विराेधक अाराेप करत अाहेत, असा आरोपही सिंग यांनी या वेळी केला.

Trending