आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Minister Of State For Home Reddy Said Rumors Spread By Political Parties On Social Media Worked To Increase Delhi Violence

काही राजकीय पक्षांकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे दिल्लीत हिंसाचार वाढला- किशन रेड्‌डी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दंगलीचा कट रचणाऱ्यांना माफ केले जाणार नाही'

हैदराबाद(तेलंगाना)- केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्‌डी यांनी दिल्लीतील हिंसाचारामगे काही राजकीय पक्षांकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना जबाबदार धरले आहे. रेड्‌डी आज(रविवार) हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की, मोदी सरकार दंगलीच्या कारणांचा शोध घेत आहे, यात एखादा कट असल्याचे समजले तर तो समोर आणला जाईल. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रचंड गोंधळ होत आहे. यात एका कॉन्स्टेबलसह अनेकांना आपला जीव गमवावा लागला.


उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) वरुन हिंसाचार भडकला. या हिंसाचारा आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात सध्या पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रशासानाने येथे एका महिन्यासाठी कलम 144 लागू केली आङे. पोलिसांनी आतापर्यंत 167 एफआयआर दाखल केल्या आहेत तर 870 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली आहे. विरोधकांनी हिंसेमागे भाजपच्या भडकाऊ भाषणांना जबाबदार ठरवले आहे तर भाजपकडून विरोधकांवर निशाना साधण्यात आला आहे.

गृह राज्यमंत्र्यांनी सीएएबाबत म्हटले की, ''सीएए कायदा कोणत्याच भारतीयाचे नागरिकत्व घेण्याचे काम करत नाही. हा कायदा फक्त पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तानमधील मुस्लिमएतर नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम करतो. देशाच्या मर्जीविरुद्ध 1948 मध्ये भारताचे विभाजन झाले होते. मागच्या सरकारने हा कायदा आणला होता, आता तेच याला विरोध करत आहेत.''

बातम्या आणखी आहेत...