आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत हे काम करताना मंत्र्याने पार केल्‍या सर्व सीमा, नंतर मोजावी लागली एवढी मोठी किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - मंत्रीपद ही अत्‍यंत महत्‍त्‍वाची जबाबदारी असते. कॅबिनेट मंत्र्यांच्‍या सुरक्षेसाठी अनेक प्रोटोकॉल्‍स बनवलेले असतात, ज्‍यांचे पालन करणे अनिवार्य असते. नुकतेच सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी नॉर्वेच्‍या एका मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पेर संडबर्ग असे त्‍यांचे नाव असून ते मत्‍स्‍यपालन मंत्रालयाचे प्रमुख होते. आपल्‍या गर्लफ्रेंड आणि मिस ईरान असलेल्‍या बहारीह लेटनेससोबत ईरानला गेलेले असताना त्‍यांनी या प्रोटोकॉल्‍सकडे दुर्लक्ष केल्‍याचे सांगितले जात आहे. ते जुलैमध्‍ये तेथे फिरण्‍यासाठी गेले होते.


नेमके काय केले
वास्‍तवात पेर यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केले नाही. मात्र ईरानला आपल्‍या गर्लफ्रेंडसोबत जाण्‍यापूर्वी त्‍यांनी याबाबतची माहिती आपल्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाला कळविली नाही. यासोबतच आपल्‍या पर्सनल ट्रिपसाठी त्‍यांनी ऑफिशिअल मोबार्इलही सोबत नेला. त्‍यांच्‍या या छोट्या छोट्या चुकांमुळेच त्‍यांना प्रोटोकॉलचे उल्‍लघंन केल्‍याप्रकरणी दोषी ठरविण्‍यात आले आहे.


याचे कारण म्‍हणजे सरकार या चुकांना अक्षम्‍य मानते. नॉर्वेच्‍या गुप्‍तचर संस्‍थांनूसार, चीन, रशियासह ईरानदेखील नॉर्वेवर गुप्‍तहेरी करतो. पेर यांच्‍या चुकांवर विरोधी पक्षांनी त्‍यांच्‍यावर टीका केलीच मात्र स्‍वपक्षीयांनीही त्‍यांना फैलावर घेतले आहे. नॉर्वेचे पंतप्रधान अरना सोलबर्ग यांनीही पेर यांच्‍या या निष्‍काळजीपणाबद्दल नाराजी व्‍यक्‍त करून त्‍यांना राजीनामा देण्‍यास सांगितले होते. त्‍यांनतर अखेर पेर यांनी राजीनामा दिला आहे.    

बातम्या आणखी आहेत...