अहमदनगर / गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांना मातृशोक, सिंधूताई एकनाथराव विखे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

दुपारी 12 वाजता प्रवरानगर येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार
 

दिव्य मराठी

Aug 18,2019 11:40:22 AM IST

अहमदनगर - दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पत्नी आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताई एकनाथराव विखे पाटील यांचे आज सकाळी 5.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या.

दुपारी 12 वाजता करण्यात येणार अंत्यसंस्कार
प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात सकाळी 9 ते 12 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मागे विखे पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.अशोक विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा मेडिकल विद्यापीठाचे प्रो-चान्सेलर डॉ.राजेंद्र विखे पाटील ही तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी 12 वाजता प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखाना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


X