आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री भामरे,महाजन,रावल,अग्रवाल,स्वीय सहायकांना जिल्हाबंदी करावी: गुंडांशी संभाषण केल्याचा अामदार गाेटे यांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यासह गिरीश महाजन, जयकुमार रावल, भाजप महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांच्यासह मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात प्रवेशबंदी करा. तसेच या सगळ्यांचे शासकीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी निरीक्षणाखाली ठेवावे, अशी मागणी अामदार अनिल गाेटे यांनी निवडणूक अायाेगाकडे केली. या सगळ्यांचे गुंड विनाेद थाेरात याच्याशी ताे काेठडीत असताना संभाषण झाले, असा अाराेपही गाेटे यांनी केला.


महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंत्र्यांनी सरकार पणाला लावले अाहे, असा अाराेप करीत अामदार गाेटे यांनी या तिघा मंत्र्यावर गुरुवारी पुन्हा टीकास्त्र साेडले. त्याचवेळी या मंत्र्यांसह त्यांच्या स्वीय सहायकांनी गुन्ह्यातील अाराेपी विनाेद थाेरात याच्याशी संभाषण केले. ताे काेठडीत असतानाही संभाषण झाल्याचे गाेटे यांनी म्हटले अाहे. तशी ध्वनिफित निवडणूक अायाेगाला तक्रारीसाेबत पुराव्यासाठी दिली अाहे. निवडणूक अायाेगाने यावर कारवाई केली नाही तर साेमवारी ही ध्वनिफित मुंबईत जाहीर करेल, असा इशाराही गाेटे यांनी दिला.


गाेटे यांनी निवडणूक अायाेगाला दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, भाजपने ७४ जागांपैकी ६२ जागांवर कमळ या अधिकृत चिन्हावर उमेदवार दिले अाहेत. यातील २८ उमेदवार सराईत गुन्हेगार अाहेत. यातीलच गुन्हा दाखल असलेल्या व गाेटे कुटुंबीयांची बदनामी हाेईल, असा मजकूर प्रसारित करणाऱ्या विनाेद थाेरात या गुन्हेगाराशी मंत्री डाॅ. भामरे, जयकुमार रावल, गिरीश महाजन यांचे संभाषण झाले. दाेन पाेलिस अधिकाऱ्यांच्या संभाषणातून ही बाब उघड झाली अाहे. लाॅकअपमध्ये असतांनाही हे संभाषण सुरू हाेते. माेहाडी पाेलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले तर त्याची कशा पद्धतीने बडदास्त ठेवण्यात अाली, याचे संपूर्ण चित्रण जनतेसमाेर येईल, असेही गाेटेे यांनी म्हटले अाहे. भाजपच्या निवडणुकीची जबाबदारी असलेले मंत्री शहरात राहिले तर ते अधिकाऱ्यांवर दडपण अाणतील. त्यामुळे या तीन मंत्र्यांसह त्यांच्या स्वीय सहायकांना तसेच अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांनाही निवडणूक हाेईपर्यंत जिल्ह्यात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी गाेटे यांनी केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...