आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ministry Alerts The State Regarding Possibility Of Violence During Counting Of Votes

Election2019/गृह मंत्रालयाने राज्यांना दिला अलर्ट, मतमोजणी दरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेच्या मतमोजणी दरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने सगळ्या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राज्यांचे प्रमुख सचिव आणि डीजीपींना पाठवलेल्या पत्रामध्ये मंत्रालयाने सगळ्या राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


गृह मंत्रालयने सांगितले की, राज्य आणि केंद्र शासित प्रदेश स्ट्रॉन्गच्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊले उचलावे. जिथे मतमोजणी होत आहे, त्या ठिकाणी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवावा. गृह मंत्रालयाने हा निर्णय ईव्हीएमवर होत असलेल्या संशय आणि मतमोजणीदरम्यान मिळत असलेल्या धमक्यांमुळे घेतला आहे.


माजी राजद नेते हत्तार दाखवत म्हणाले- गोळी चालवण्यासाठी फक्त आदेशाची वाट पाहत आहे
पटनामध्ये माजी राजद नेते रामचंद्र यादव यांनी एका प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान हत्यार काढले. ते रायफल हवेत धरून म्हणाले- आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी तयार आहोत. फक्त महागठबंधनच्या नेत्यांनी आदेश द्यावा की, आपल्याला संविधानाची रक्षा करायची आहे. मी राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, ममता बनर्जी, उपेंद्र कुशवाहा आणि तेजस्वी यादव यांना सांगू इच्छितो की, फक्त ओरड्याने काम होणार नाही. आपल्याला आपला हक्क मिळाला नाही तर लढा द्यावा लागेल. मी आपला हक्क हिसकाउन घ्यायला तयार आहे.


उपेंद्र कुशवाहा यांनी दिली हिंसाचाराची धमकी
महागठबंधनच्या मंगळवारी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये उपेंद्र कुशवाहाने ईव्हीएममध्ये गडबडी असल्याचा मुद्दा उचलून धरला आणि म्हणाले, शासनाला अलर्ट राहण्याची अपील करतो. ज्याप्रकारे गडबडी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत, जर असे खरच असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये प्रचंड राग आहे. जर ईव्हीएममध्ये गडबडी झाली तर रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील. सत्ताध्याऱ्यांनी काही गडबडी केली तर महागठबंधन शांत बसणार नाही.

बातम्या आणखी आहेत...