आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षीय मुलगा घरातूनर नवीन BMW कार घेऊन निघाला, ड्रायव्हर मागून ओरडला- \'छोटे मालक थांबा\', आणि काही मिनीटातच घडली ही भयंकर घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंदुर(मध्य प्रदेश)- रेसकोर्स रोडवर नवीन BMW कार चालवत असलेल्या 16 वर्षीय मुलाने बाईकवरून जात असलेल्या व्यक्तीला मागून धडक मारली. टक्कर लागताच बाईक उडाली आणि व्यक्ती कारच्या चाकाकाली आला. त्यानंतर मुलाने गडबडीत रस्त्यावरचे डिव्हाडर तोडून दुसरीकडे कार नेली, पण लोकांनी त्याला तिथेच घेरले. गाडीत मुलगा असल्यामुळे लोकांनी त्याला मारले नाही, नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.


तुकोगंज पोलिसांनी सांगितले की, घटना बुधवारी दुपारी 12 वाजता रेसकोर्स रोडवर घडली. आपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आनंद(33) आहे. काही कामा निमीत्त ते या रेसकोर्स परिसरात आले होते आणि आपले काम संपवून परत जात होते.


मागून ड्रायव्हर आवाज देत होता...'छोटे मालक थांबा....'

प्रत्यक्षदर्शी कमाल खानने सांगितले की, बीएमडब्ल्यू कार अचानक गल्लीत वेगाने आली. मागून ड्रायव्हर आवाज देत होता- 'छोटे मालक थांबा...' कारमध्ये हिरव्या रंगाचा शर्ट घातलेल्या एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. वेगाने येत असलेल्या पांढऱ्या बीएमबब्ल्यू कारने आनंद यांना मागून जोरदार टक्कर मारली. टक्कर लागताच आनंद कारच्या चाकाखाली आले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात नेले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी जीव सोडला.


 

बातम्या आणखी आहेत...