आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंबमध्‍ये नारळ हिसकावल्‍यामुळे 34 वर्षीय व्‍यक्‍तीची हत्‍या, अल्‍पवयीन मुलावर गुन्‍हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब (उस्‍मानाबाद) - अल्‍पवयीन मुलाने तलावातून काढलेले कळसाचे नारळ हिसकावल्‍यामुळे एका ३४ वर्षीय व्‍यक्‍तीची धारदार चाकुने हत्‍या करण्‍यात आली. कळंब तालुक्यातील ग्राम चापर्डा शिवारात रविवारी दुपारच्‍या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सुधाकर पंडीत गव्हाणे असे मृत व्‍यक्‍तीचे नाव आहे. ते चापर्डा येथील रहिवासी होते.

 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, तालुक्यातील चापर्डा येथे एक अल्पवयीन मुलगा तलावात कळसाचे नारळ खाण्यासाठी शोधत होता. त्यावेळी खोल पाण्यात त्याला नारळ सापडले. मात्र, सापडलेले नारळ सुधाकर लव्हाणे याने अल्पवयीन मुलाला मागीतले. मुलाने ते देण्यास नकार दिल्याने दोघांत शाब्दीक वाद झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात अल्पवयीन मुलाने सुधाकर लव्हाणे याच्या छातीवर आणि पोटावर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुधाकर लव्हाणे याचा जागीच मृत्यू झाला.


कळंब शहरात रविवारी शांततेत गणपती विसर्जन सुरू असतांना तालुक्यातील चापर्डा येथे खूनाची घटना घडल्याने ठाणेदार रनधीर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्‍यात आले. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पंडीत लव्हाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीसांनी गुन्‍हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रनधीर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस करीत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणीतील अल्पवयीन मुलगा हा यवतमाळातील अंबिका नगरातील रहिवासी असून तो आठ दिवसापासून चापर्डा येथील मामाकडे राहायला आला होता.

बातम्या आणखी आहेत...