आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Minor Children Are Changing Aadhar Card's Photo date Of Birth With The Help Of App To Watch 'Kabir Singh' Movie

‘कबीर सिंह’ चित्रपट पाहण्यासाठी अल्पवयीन मुले अॅपच्या मदतीने बदलताहेत ‘आधार’ कार्डावरील फोटो-जन्मतारीख; केंद्र सरकारने कठाेर उपाययाेजना करण्याची केली जातेय मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अलीकडेच प्रदर्शित झालेला शाहिद कपूर अभिनीत  ‘कबीर सिंह’ हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले  त्यांच्या ‘आधार’ कार्डावरील वय व जन्मतारीख बदलत आहेत. चित्रपटगृहांत हा चित्रपट पाहण्यासाठी माेठी गर्दी हाेत असून, ताे सुपरहिट हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, चित्रपट प्रमाणन मंडळाने या चित्रपटास ‘ए’ म्हणजे प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांना ताे पाहता येणार नाही. असे असले तरी हा चित्रपट पाहण्यासाठी अल्पवयीन मुले माेठी गर्दी करत असून, त्यासाठी ते तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर करत आहेत. याचे जिवंत उदाहरण राजस्थानच्या जयपूर शहरात समाेर आले आहे. 


जयपुरातील एका अल्पवयीन मुलाने ‘कबीर सिंह’ पाहण्यासाठी  ‘आधार’ कार्डावरील फाेटाे व जन्मतारखेत मोबाइल अॅपवरून फेरबदल केला. त्यामुळे त्याला चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर कुणीही राेखले नाही. असाच प्रकार दुसऱ्या एका तरुणासाेबत घडला. त्याने सांगितले की, असाच प्रकार करून मी ‘बुक माय शो’  वरून या चित्रपटाची अनेक तिकिटे बुक केली. या प्रकाराबाबत तिकीट बुकिंग संकेतस्थळ ‘बुक माय शो’च्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, तिकीट बुक करताना आमच्या वेबसाइटवर एक पॉप-अप दिसते, जे १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले ‘ए’ रेटड सिनेमा पाहू शकत नसल्याचे सांगते;परंतु  नागरिक व मुले या पॉप-अपकडे दुर्लक्ष करून तिकिटे बुक करतात. हा ऑनलाइन व्यवहार असल्याने आम्ही काही करू शकत नाही.  

 

‘ए’ रेटेड चित्रपटांच्या तिकिटांवर असताे लाल रंगाचा शिक्का 
मल्टिप्लेक्स थिएटर ‘कबीर सिंह’बाबत हाेणाऱ्या अशा गंभीर प्रकारांचा सामना करत आहेत. कारण अल्पवयीन मुले माेठ्या संख्येने हा चित्रपट पाहत आहेत. एखादा ग्राहक ‘ए’ रेटेड चित्रपटाबाबत चाैकशी करताे तेव्हा आम्ही त्यास संबंधित चित्रपट केवळ १८ वर्षांवरील मुलेच पाहू शकत असल्याचे स्पष्टपणे सांगताे. तसेच आम्ही ‘ए’ रेटेड चित्रपटांच्या तिकिटांवर एक लाल रंगाचा शिक्काही मारताे; परंतु तरीही अनेक अल्पवयीन मुले ‘कबीर सिंह’ पाहण्यासाठी सर्व मर्यादा पार करत आहेत, असे मुंबईतील आयनॉक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

नायक ‘कबीर’चे तरुणाईकडून केले जातेय काैतुक 
या चित्रपटात नायक कबीर सिंहची काेणतीही गाेष्ट मिळवण्याच्या तीव्र इच्छेबाबत दाखवण्यात आले असून, त्याच्या या इच्छेचे तरुणाईकडून काैतुक केले जात आहे. मात्र, असे करताना तरुणांनी अनावश्यक महिमामंडनाच्या नकारात्मक प्रभावापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. हा चित्रपट मेंदूचा वापर न करता पाहिला गेला पाहिजे व ताे पाहून झाल्यानंतर विसरून गेले पाहिजे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वागू लागल्यास व्यक्ती वास्तव मार्गावरून भटकू शकते. 
- डॉ. अनामिका पाप्रीलवाल, मनोवैज्ञानिक