आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती- नातेवाइकाकडे काही कामानिमित्त आलेल्या १५ वर्षीय युवतीवर ५० वर्षीय व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास माहुली जहागिर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. दरम्यान युवतीने तक्रार करताच पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेच्या वेळी पीडित युवती ही काही कामानिमित्त तिच्या नातेवाइकांकडे आली होती. दरम्यान त्याच वेळी आरोपीने मागून येत तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. युवतीने ओरडण्याचा प्रयत्न करताच तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतरही याबाबत कुठे वाच्यता केल्यास युवतीला जीवानिशी मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या युवतीने घर गाठून घडलेला प्रकार कुटुंबीयांच्या कानावर टाकला. आराेपीच्या धमकीला न जुमानता युवतीने रविवारी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला व त्वरित आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास माहुली जहागीर पोलिस करीत आहेत.
अल्पवयीन युवतीचा विनयभंग: मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात एका २५ वर्षीय युवकाने १७ वर्षीय युवतीचा विनयभंग गेल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी अल्पवयीन युवती ही काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ती परत येत असताना आरोपी युवकाने तिला रस्त्यात गाठून तिचा हात पकडत असभ्य वर्तन केले. युवतीने मंगरूळ पोलिस ठाणे गाठून युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलिस करीत आहेत.
पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
दिवसेंदिवस शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडणाऱ्या या घटनांमुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.