आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mobile वर गेम खेळत होती 14 वर्षांची मुलगी, आईने रागवताच उचलले टोकाचे पाऊल; वडिलांचे भावनिक आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - लहान मुलांनी काहीही म्हटल्यास त्यावर दुर्लक्ष करू नका. ते नेहमीच मस्ती-मजाक करत नाहीत असे आवाहन आत्महत्या करणाऱ्या 14 वर्षीय मुलीच्या वडिलांना केले आहे. अवघ्या 14 वर्षांची त्यांची मुलगी मोबाईलवर गेम खेळत होती. खूप वेळ मोबाईलमध्येच व्यस्त असल्याने तिच्या आईला राग आला. तिने रागावून मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यावर ही मुलगी इतकी चिडली की तिने दार बंद केले. त्याच बंद खोलीत तिने आत्महत्या केली. 


पीडित वडिलांचे भावनिक अपील...
ही घटना घडली तेव्हा मुलीचे वडील घरी नव्हते. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, "आपली मुले काहीही म्हणत असतील तर त्यावर दुर्लक्ष करू नका. ते नेहमीच मजाक करत नाहीत. त्यांच्याशी संवाद वाढवा. त्यांच्या अडचणी विचारा. माझ्या मुलीला फासावर लटकल्याने काय होते. किंवा मरण काय असते याची कल्पना देखील नव्हती. ती फक्त 14 वर्षांची होती." ते पुढे म्हणाले, "रागात असलेल्या आपल्या आईला घाबरवण्यासाठी तिने फास बनवला होता. परंतु, फासावर लटकल्याने मृत्यू होऊ शकतो हे तिला कदाचित माहितच नसेल. त्यामुळेच मी सर्व पालकांना आवाहन करतो की आपल्या मुला-मुलींना बरे आणि वाईट काय असते यातील फरक समजावून सांगा. 22 जुलै रोजीच तिने आपला 14 वा वाढदिवस साजरा केला होता. ती 9 वीला होती. तरीही आम्ही तिला जे हवे ते दिले. येथेच आम्ही चुकलो. कदाचित मी तिला समजावून सांगितले. मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितले असते तर ती आज आमच्यात असती. तिने यापूर्वीही मजाकमध्ये मोबाईल वापरण्यास मज्जाव केला तर फाशी घेईन अशा धमक्या दिल्या होत्या. आम्ही तिच्या धमक्यांची गंभीर दखल घेऊ शकलो नाही."

बातम्या आणखी आहेत...