आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक..मामाच्या कुकर्मामुळे अल्पवयीन भाची झाली गरोदर, तोंड दाबून मुलीवर केला अनेकदा अत्याचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- चुलत मामाने तोंड दाबून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याने तीला गर्भधारणा झाली आहे. नात्याला कलंक फासणारी ही घटना तालुक्यातील हिवरखेड येथे उघडकीस आली आहे. प्रकरणी अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम मामाला पुण्यातून अटक केली आहे.

 

तालुक्यातील हिवरखेड येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच नात्याने चुलत मामा असलेल्या तानाजी विठोबा शिंगाडे (वय-30) याने रात्रीच्या वेळी वेळोवेळी तोंड दाबून अत्याचार केला. त्यामुळे मुलीली तीन महिन्याची गर्भधारणा झाली. ही घटना अत्याचारग्रस्त मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने 6 फेब्रुवारीला हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तानाजी शिंगाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला होता. यावेळी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शिंगाडे यास पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...