आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Minor Girl Molestation By Father From 3 Years Due To Porn Videos In Noida New Delhi

रडतच पोलिसांकडे गेली मुलगी- \'माझे पप्पा घाण काम करतात, त्यांना लगेच पकडा, घाण व्हिडिओ पाहून माझ्यासोबतही तेच करतात\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - चौदा वर्षांच्या एका मुलीने आपल्याच वडिलांवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. 3 वर्षांपासून बाप मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचे शोषण करत होता. यादरम्यान, मुलगी दोन वेळा घर सोडून पळून गेली. परंतु आरोपी बापाने तिला पुन्हा बळजबरी घरात आणले. या मुलीच्या आईची मानसिक स्थिती ठीक नाही, यामुळे तिला तक्रार करता येत नव्हती. दुसरीकडे, मुलीला तिचा बाप धमक्या द्यायचा. यामुळे त्रस्त होऊन अखेर तिने बुधवारी संध्याकाळी आरोपी जेव्हा फॅक्ट्रीमध्ये ड्यूटीवर गेला होता, घरातून गुपचूप निघून जवळच्या पोलिस स्टेशनवर धाव घेतली. आणि रडतच आपल्या बापाच्या कुकृत्यांचा पाढा वाचला. मुलीची भयंकर आपबीती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरी जाऊन आरोपी बापाला अटक केली. ही घटना नोएडाच्या फेज-3 एरियातील छिजारसीची आहे.


'कुठपर्यंत घाबरत राहू, आता सहन होत नाही'

याप्रकरणी तपास करत असलेले सब इन्स्पेक्टर सनत मिश्रा म्हणाले की, बुधवारी संध्याकाळी मुलगी रडतच छिजारसी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. म्हणाली की, पोलिस अंकल, माझा पप्पा घाण काम करतात, त्यांना लवकर पकडा. स्टेशन इंचार्जने शांत करत तिला त्रासा विचारला, तेव्हा तिने सांगितले की, माझे पप्पा घाण व्हिडिओ पाहून अनेक वेळा नशेमध्ये, तर अनेक वेळा असेही घाण काम करतात. आईची मानसिक स्थिती ठीक नाही. यामुळे त्यांना कोणीही विरोध करू शकत नाही. मागच्या 3 वर्षांपासून ते असेच करत आहेत. यामुळेच घरातून दोन वेळा पळून आत्या आणि आजी-आजोबांकडे गेले. परंतु तेथून त्यांनी पुन्हा मला बळजबरी घरी आणले. येथे आल्यानंतर त्यांनी जिवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे तक्रार करू शकत नव्हते. पप्पाला भिऊन जगत आहे, पण आता सहनच होत नाही. जर पप्पाला अटक केली नाही, तर ते मला मारून टाकतील, नाहीतर मला तरी आत्महत्या करावी लागेल.

 

अल्पवयीन मुलगी म्हणाली, मी स्वत: कमवीन, घरखर्च भागवीन

मुलीचे बोलणे ऐकून पोलिस स्टेशन प्रभारी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांची टीम मुलीला सोबत घेऊन तिच्या घरी गेले आणि आरोपीला त्यांनी अटक केली. आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो अॅक्टमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीने पोलिसांना सांगितले की, तिला दोन छोटे भाऊ आहेत. यामुळे वडील जेलमध्ये गेल्यानंतर घरखर्च चालवणे कठीण होईल. यासाठी ती आता स्वत:च मेहनत करून घरखर्च भागवणार आहे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...