वर्धा / जन्मदात्या पित्या कडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी वडिलाला न्यायालयीन कोठडी

  • मुलगी हिंगणघाट येथील शासकीय वस्तीगृहात राहायची

प्रतिनिधी

Feb 13,2020 07:43:00 PM IST

वर्धा- हिंगणघाट येथील वसतीगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडून विनयभंग केल्याची घटना घडली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातील राहवासी असून, आरोपी हा कामानिमित्त जबलपूर वास्तव्यास होता. 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तिच्या आजी व मामाकडे राहत होती. अल्पवयीन मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावे याकरिता मुलीच्या मामाने तिला हिंगणघाट येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला.

तिला भेटण्याकरिता आजी, मामा व वडील महिन्या - दोन महिन्यांत तिच्या भेटीसाठी येत असयाचे, 12 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलीचे वडील तिला भेटायला आले असता,त्याने तिला वसतिगृहा जवळ असलेल्या परिसरात घेऊन गेले आणि लज्जास्पद कृत्य केल्याची माहिती वसतिगृहातील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. संबधीत कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीसोबत जन्मदात्या पित्याकडून अत्याचाराची घटना घडली असल्याची माहिती चाइल्ड लाइनला देण्यात आली. घटनेची माहिती घेऊन मुलीला पोलिस स्टेशनमध्ये आणून रीतसर तक्रार देण्यात आली.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी 354,452 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी पित्याला रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

X