Home | National | Other State | minor girl murder by lover in Palwal Haryana

गर्लफ्रेंडला घरातुन पळुन घेऊन गेला प्रेमी, काहि दिवस सोबत राहुन केले हे भयानक काम....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:06 AM IST

मृतदेहाला झाडात फेकून न्यायालयात आत्मसमर्पण केले.

 • minor girl murder by lover in Palwal Haryana

  पलवल- एका नाबालिकला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला हरिद्वारला घेऊन गेला. काही दिवस दोघे सोबत राहिले. पैसे संपल्यावर युवकाने तिला घरी जाण्याचे सांगितले. मुलीने नकार दिला. त्यानंतर त्याने तिला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि डोक्यात विट मारली. त्यात तिचा जागीच मृत्यु झाला. मृतदेहाला झाडात फेकून दिले. त्यांनंतर न्यायालयात आत्मसमर्पण केले.

  पोलिस चैाकशीत त्याने त्याचा गुन्हा मान्य केला.

  दोघांमध्ये अशी झाली मैत्री, नंतर बनवला पळून जाण्याचा प्लान
  पोलिसांनी हरिद्वारच्या रुग्नालयात ठेवलेल्या मृतदेहाची ओळख पटवून कुटुंबाच्या स्वाधिन केले आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. कँप ठाण्याचे प्रभारी विश्व गौरव म्हणाले की, 22 ऑक्टोबर 2018 ला पलवलच्या रौनीजा गावामध्ये राहणारे अमित कुमार 16 वर्षीय युवतीला पळवून घेऊन गेला. त्यानंतर त्याच्या विरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सरू होता. 5 नोव्हेंबरला आरोपीने पलवल न्यायालयात आत्मसमर्पण केले.

  यामुळे मारले मुलीला
  22 ऑक्टोबरला दोघे घरातुन पळून गेले. जेव्हा पैसे संपून गेले तेव्हा त्याने युवतीला घरी वापस जाण्याचे सांगितले. पण तिने नकार दिला. तिला एकटीला सोडुन आला असता तर तिने पोलिसांकडे त्याच्या विरूद्ध तक्रार केली असती. त्यामुळे घाबरून त्याने तिला मारून झाडांमध्ये फेकून दिले.

Trending