आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीनवर बलात्कार व खून; न्यायालयाने स्वत:हून स्युमोटो दाखल करून घेत दिले चौकशीचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैनिताल- उत्तराखंड उच्च न्यायालयाने येत्या ४८ तासांत विशेष पोलिस पथक स्थापन करून उत्तरकाशीमध्ये घडलेल्या बलात्काराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. उत्तरकाशीमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे.  


याप्रकरणी न्यायालयाने स्वत:हून स्युमोटो दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या बलात्कार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. यासाठी लोकांनी निदर्शनेही केली आहेत. न्या. राजीव शर्मा व न्या. मनोज तिवारी यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा देण्यात यावी. तसेच निकाल लवकर लागण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा.  उत्तरकाशी जिल्ह्यातील भाकडा गावात १७ ऑगस्टच्या रात्री एका ११ वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी चार मजुरांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...