आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत चिमुरडीवर बलात्कार, संतप्त जमावाने 2 बस फोडल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - शहरातील बावण खोली भागात सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मधुकर निवृत्ती वाठोरे यास अटक केली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री या घटनेचे संतप्त पडसाद शहरात उमटले. एका जमावाने रात्री साडेसातच्या सुमारास एसटी महामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या. यात एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. 

 

रविवारी सदर मुलीच्या घरी कोणी नसताना मधुकर याने पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला घरात बोलावत बलात्कार व अनैसर्गिक आत्याचार केला. सदर मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिने ही बाब वडिलांना सांगितली. सोमवारी पीडित मुलीच्या वडिलांनी हिंगोली शहर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३७७ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्याखालील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 

 

१० ते १५ जणांच्या जमावाकडून बसेसवर दगडफेक 
अकोला आगराची बसगाडी क्रमांक एमएच १४ बीटी ४७३९ (पंढरपूर- अकोला) नरसी टी पॉइंट वर फोडण्यात आली. या बसच्या चालक एम.जे. खैरे व वाहक एस. एन. माताडे यांनी सांगितले की १०-१५ तरुणांचा जमाव अचानक बस समोर आला आणि त्यांनी बस गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सदरील बस हिंगोली शहरातून जात असताना गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. गाडीवर अचानक दगडांचा वर्षाव झाला. त्यामध्ये गाडीच्या डाव्या बाजूच्या काचा फुटल्या. मारण्यात आलेला दगड एका प्रवाशाला लागला. परंतु त्याला सुदैवाने किरकोळ इजा झाली. हिंगोली आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८५५९ सेनगाववरून हिंगोलीकडे येत असताना बावण खोली भागात तिच्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. दोन्ही घटना आज रात्री ७.३० चे सुमारास घडल्या असून बावण खोली भागात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची त्याला पर्शभूमी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही घटनांमुळे हिंगोली शहरात तणाव निर्माण झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...