Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Minor girl raped; accused have 7 years jail, one year's to helpers

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला ७, मदत करणाऱ्यांस १ वर्षाची सक्तमजूरी

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 06:48 AM IST

अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे तर त्यास मदत करणाऱ्या दोघांना प्रत्येकी एक-एक वर्षाची सक्तम

  • Minor girl raped; accused have 7 years jail, one year's to helpers

    सोलापूर- अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे तर त्यास मदत करणाऱ्या दोघांना प्रत्येकी एक-एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सोलापूर न्यायालयाने सुनावली आहे. शिवयोगी परते (२२) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.


    लग्नाचे आमिष दाखवून शिवयोगीने १२ जुलै २०१४ रोजी मुलीला पळवून नेले. यासाठी त्याला दुर्गेश संगम (२२) आणि बलभीम कल्याणी (२२) यांनी मदत केली. या प्रकरणी पीडिता, आई-वडील, तपासी अंमलदार व इतर साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शिवयोगी परतेला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ नुसार ७ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच अन्य कलमानुसार ४ वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड तसेच ३६३ नुसार १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या तिन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. दुसरे दोन्ही आरोपी दुर्गेश ऊर्फ मुत्तू संगम व बलभीम कल्याणी यांना एक एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

Trending