आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावांसह काकांनी केला 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, मग शेतात फेकला शिरच्छेद केलेला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर - रक्ताच्या नात्यांना काळीमा लावणारी आणि माणुसकीच्या सर्वच सीमा ओलांडणारी घटना मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात समोर आली आहे. येथील बंडा तालुक्यात एका 12 वर्षांच्या मुलीचा शिर नसलेला धड सापडला. ती 13 मार्चपासून बेपत्ता होती. शवविच्छेदनात तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आली. सविस्तर तपासात आरोपींची नावे समोर आली तेव्हा पोलिसांना सुद्धा धक्का बसला. तिच्यावर बलात्कार करणारे बाहेरचे नाही तर घरातच राहणारे तिचे तीन सख्खे भाऊ होते. या कृत्यामध्ये तिचा सख्खा काका आणि काकू सुद्धा सहभागी होते. पोलिसांनी यापैकी चौघांना अटक केली. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.


13 मार्च रोजी झाली होती बेपत्ता, काकूने केली दिशाभूल
- सागरचे पोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती जारी केली. त्यानुसार, सागर जिल्ह्यातील बंडा तालुक्यात राहणारी 12 वर्षांची मुलगी 13 मार्च रोजी परीक्षा देऊन घरी येणार होती. परंतु, संध्याकाळपर्यंत पोहोचली नाही तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. परंतु, दुसऱ्याच दिवशी 14 मार्च रोजी तिचा मृतदेह शिर नसलेल्या अवस्थेत सापडला.
- यानंतर पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली. पीडितेबद्दल संपूर्ण माहिती असतानाही काकू सुशीलाने पोलिसांची दिशाभूल केली. कुटुंबियांचे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीशी वैर आहेत. त्यानेच या मुलीचा खून केला असे आरोप तिने लावले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक करून चौकशी केली तेव्हा तो निर्दोष निघाला. मग, तपास सुरू असतानाच पीडितेचा मोठा भाऊ (20) बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी पीडितेचा दुसरा 19 वर्षांच्या भावाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली, आणि संपूर्ण हकीगत पोलिसांसमोर मांडली.


सख्ख्या बहिणीवर रेप करताना काकांनी रंगेहात पकडले तेव्हा...
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, 13 मार्च रोजी दुपारी पीडित शाळेत परीक्षा देऊन घरी येत होती. त्याचवेळी तिला भूलथापा देऊन सर्वात मोठा भाऊ रामदास अहिरवार (20) काकांच्या (बंसीलाल) घरी घेऊन गेला. या ठिकाणी त्याने आपल्या बहिणीवर बलात्कार केला. रामदास आणि बहिण कुठे आहेत याची माहिती 19 वर्षांचा भाऊ ब्रजेश आणि तिसऱ्या अल्पवयीन भावाला होती. ते देखील आपल्या काकाच्या घरी पोहोचले. यानंतर तिघांनीही पीडितेवर सामूहिक अत्याचार केला.
- हे सर्व होत असताना काकू सुशीला घरातच होती. तिने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितला. अत्याचार सुरू असतानाच काका बंसीलाल घरी आला आणि त्याने सर्वांना रंगेहात पकडले. सुरुवातीला त्याने सर्वांना रागावले आणि मारहाण करून पीडितेच्या भावांना दूर केले. यानंतर वासनांध बंसीलालने सुद्धा पीडितेवर बलात्कार केला. पोलिस तपासात मोठा भाऊ रामदासने यापूर्वीही पीडितेवर आपल्या राहत्या घरात अत्याचार केले होते असे समोर आले आहे.


पोलिसांना सांगेन म्हणताच केली इतकी निर्घृण हत्या...
तीन भाऊ आणि काकांनी आळी-पाळीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. परंतु, पीडित मुलगी त्या सर्वांना शिक्षा मिळवून देण्यावर ठाम होती. कुठल्याही परिस्थितीत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा पोलिसांत सांगणारच असे तिने स्पष्ट केले. आरोपींनी तिचा गळा आवळला. यानंतरही ते थांबले नाहीत. तिची ओळख लपविण्यासाठी कोयत्याने तिचे शिर धडावेगळे केले. मग, शिर नसलेला मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी यातील काका, काकू, आणि दोन भावांना अटक केली. तर सर्वात मोठा भाऊ आणि मुख्य आरोपी रामदास फरार आहे. त्याला सुगावा देणाऱ्यांसाठी पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...