आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत राहात होती अल्पवयीन मुलगी..नराधमाने जिवे मारण्याच्या धमक्या देत सलग तीन वर्षे केला लैंगिक छळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद- आईसोबत राहात असलेल्या तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत मुलीचा सलग तीन वर्षे लैंगिक छळ करणारा आणि जबरदस्ती किळसवाणे प्रकार करायला लावणारा परिचित आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी (21 डिसेंबर) सुनावली. विशेष म्हणजे कायद्यातील दुरुस्तीनंतर पोक्सो कायद्याअंतर्गत जिल्हा कोर्टात पहिल्यांदाच जन्मठेप सुनावण्यात आली, हे विशेष.

 

या प्रकरणी शहरातील पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी मुलीचे आई-वडील वेग‍ळे राहतात, तर पीडित मुलगी ही आई व भावासोबत राहाते. आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन (28, रा. म्हाडा कॉलनी, मूर्तीजापूर परिसर) याचे मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. 2014 मध्ये मुलगी घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून आरोपीने घराचे दार लावून घेतले व तिच्याशी झटापट करीत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीसह आई व भावाला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतरही धमक्या देत सलग तीन वर्षे आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तसेच किळसवाणे प्रकारही करायला लावले.

 

कंटाळून या प्रकाराची माहिती मुलीने आपल्या आईला दिली. या प्रकरणी मुलीने 4 सप्टेंबर 2017 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि 376 (2)(एफ)(एन) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) 5 व 6 कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कोते यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 

 

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी, फिर्यादीची आई व डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच प्रकरणात वैद्यकीय पुरावाही महत्वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३७६ (२)(एफ)(एन) तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या 5 व 6 कलमान्वये दोषी ठरवले. आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...