आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच अल्पवयीन मुलीला देह व्यापारात ढकलले, भावानेही केला अत्याचार; पाच जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील मानखुर्द भागात आईनेच पोटच्या मुलीला देह व्यापारात ढकलल्याची आणि पैशांसाठी एका वृद्धाला विकण्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीने विरोध केल्यानंतर भावाने तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी याप्रकरणी आई-भावासह पाच जणांना अटक केली आहे. 
 

आईने 60 वर्षीय वृद्धाला विकले
पोलिसांनी सांगितल्यानुसार, 16 वर्षीय पीडिताच्या आईने गेल्यावर्षी अल्पवयीन मुलीचे एका युवकाबरोबर लग्न लावून दिले होते. तिचा पती बळजबरीने संबंध बनवण्यासाठी तिला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून पीडिता काही दिवसांपूर्वी मुंबईला आपल्या आईकडे आली. पण येथेही तिचा छळ करण्यात येत होता. भावानेच आपल्यावर अत्याचार केल्याचा पीडितेने आरोप केला आहे.   

यानंतर काही महिन्यांनी आई मुलीला दलालाकडे घेऊन गेली. येथे तिला देह व्यापार करण्यास बळजबरी करण्यात आली. यानंतर आईने पीडितेला 60 वर्षीय एका व्यक्तीला विकले. त्याने सुद्धा पीडितेसोबत बळजबरीने शारिरीक संबंध बनवले. कसं तरी पीडितेने तेथून पळ काढला आणि शनिवारी मानखुर्द पोलिस स्टेशन गाठले. तेथे तिने पोलिसांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. 
 

आरोपींना 3 दिवसीय पोलिस कोठडी  
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. रविवारी सर्वांना विशेष न्यायालयात उभे करण्या आले. कोर्टाने त्यांना 3 दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला. 

आरोपींविरोधात कठोर कारवाई करणार - पोलिस
पीडितेला वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या पीडितेचे पालक एखाद्या सेक्स रॅकेटशी संबधीत आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपासणी करण्यात येऊन सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.