Maharashtra Crime / अल्पवयीन मुलीला झाडाला बांधून पाय मोडले, मग डोक्यात दंडुक्याने वार करून केला निर्घृण खून, पुण्यातील धक्कादायक घटना


मुलाला बोलल्याच्या रागातून केली हत्या

Sep 03,2019 05:25:09 PM IST

पुणे- प्रियकराने महिला व तिच्या मुलीला केलेल्या गंभीर मारहाणीत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली. गंभीर मारहाणीनंतर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. रुग्णालयातून पोलिसांना माहिती समजल्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.


अल्पवयीन मुलीची आई गेल्या बारा वर्षांपासून आपल्या पती पासून विभक्त राहते. ती आपल्या मुलीसह आरोपी गणेश खरातसोबत निमसाखर येथे राहत होती. दरम्यान अल्पवयीन मुलगी एका मुलाशी बोलत होती, या कारणावरून रागावलेल्या गणेश खरात याने सोमवारी रात्री या दोन्ही मायलेकींना आपल्या दुचाकी वाहनावर बसवून जवळच्या वनक्षेत्रात निर्जनस्थळी नेले. अल्पवयीन मुलगी अश्विनी हनुमंत पोटफोडे( वय 15) हीच्या पायावर आणि कपाळावर दंडुक्याने जबर मारहाण केली. दरम्यान मुलीस सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या आईलाची दंडुक्याने मारले. त्यामुळे तिच्या आईने जीवाच्या आकांताने तेथून पळ काढला आणि गावात येऊन मदतीचा याचना केली.


यानंतर ग्रामस्थांनी मुलीस खासगी रुग्णालयात दाखल केले, पण मारहाणीत वर्मी घाव बसल्यामुळे जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे निमसाखर गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा प्रियकर समीर उर्फ गणेश हनुमंत खरात (रा. निमसाखर, ता.इंदापूर) याच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

X