आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांसाठी डबा घेऊन निघाली होती चिमुकली, 15 दिवसांनंतर दगडांखाली सापडला विक्षिप्त मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या खोह नागोरियन भागात एका 8 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह दगडांखाली दबलेल्या अवस्थेत सापडला आहे. ही तीच मुलगी आहे जिचे 15 दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. चिमुकली बेपत्ता झाली तेव्हाच कुटुंबियांनी पोलिसांत यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे अपहरणकर्त्यांनी तिचा खून केला असा कुटुंबियांचा आरोप आहे. हा मृतदेह स्थानिकांना सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सापडला. त्यांनीच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. चिमुकलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेवरून स्थानिकांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. तसेच पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. 


वडिलांचा डबा घेऊन निघाली होती मधु...
25 सप्टेंबर रोजी मधु (8) आपले वडील मिंटू यांच्यासाठी डबा घेऊन निघाली होती. तिच्या वडिलांचे एक दुकान आहे. परंतु, त्या दिवशी मधु दुकानावर पोहोचलीच नाही. फोन करून विचारले तेव्हा घरातही तिचा पत्ता लागला नाही. यानंतर घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. परंतु, पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही असा आरोप तिच्या वडिलांनी लावला आहे. 

 

लैंगिक शोषणाची शक्यता... 
- आपल्यावर लावलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले. सोबतच मुलगी बेपत्ता झाली त्या परिसरात खूप चौकशी केली. परंतु, तेथे एकही सीसीटीव्ही सापडला नाही. सोबतच स्थानिकांना सुद्धा ती मुलगी दिसली नाही. अशा प्रकारची स्पष्टीकरणे पोलिसांकडून दिली जात आहेत. 
- दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेच्या दोन्ही बाजूंचा तपास केला जाणार असे आश्वासन दिले. सध्या शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. सोबतच त्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची शक्यता सुद्धा नकारता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...