आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल हिसकावल्याचा इतका राग! 12 आणि 14 वर्षांच्या मुलींनी केली आईची हत्या; एकीने भोसकले, दुसरीने घातल्या गोळ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेत दोन मुलांची आई राहिलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात सापडला. तिचा मृतदेह पाहताक्षणी पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. तिच्या छातीवर चाकूचे अनेक वार करण्यात आले होते. तसेच गोळ्या देखील घालण्यात आल्या होत्या. ती आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत मिसीसिपी प्रांतात मॅगनोलिया शहरात राहत होती. पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केल्यानंतर पहिलाच संशय पीडितेच्या सख्ख्या मुलींवर आला. त्यांना तपासासाठी नेले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनीच आपल्या आईची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या 12 आणि 14 वर्षांच्या मुलींच्या डोक्यात सख्ख्या आईच्या मर्डरची प्लॅनिंग गेल्या कित्येक दिवसांपासनू सुरू होती.


मोबाईल हिसकावल्याचा काढला राग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीमध्ये 32 वर्षीय महिलेचा खून तिच्याच दोन मुलींनी केल्याचे समोर आले आहे. केवळ मोबाईलवरून झालेल्या वादाने इतके भयंकर स्वरूप घेतले. पोलिस चौकशीत शेजारी आणि त्या मुलींनी सुद्धा आपल्या आईचा खून केल्याची कबुली दिली. दोन्ही बहिणींना स्मार्टफोनचे जणू व्यसन लागले होते. त्या आपल्या आईचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. आईने थोडेसेही अडवल्यास त्यांना राग यायचा. एक दिवस आईने त्या दोघींचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. याच गोष्टीवर मुली इतक्या संतापल्या की त्यापैकी एकीने आईच्या छातीवर किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाकूने प्रहार सुरू केले. हल्ला अचानक झाल्याने सुरुवातीला तिला काहीच कळाले नाही. कळताच ती बाहेरच्या दिशेने धावली. तोपर्यंत दुसऱ्या मुलीने तिला शूट केले आणि आई जागीच कोसळली.


यापूर्वीही केला हत्येचा प्रयत्न, तरीही आई ती आईच...
गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आपल्या आईच्या हत्येचा कट रचत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या आईला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. यातून ती जखमी झाली आणि पण तिचा जीव वाचला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित महिलेने त्याचवेळी आपल्या आईची तक्रार केली असती तर त्यांना तेव्हाच अटक केली असती. परंतु, आईने त्यांना माफ केले. खरोखर आई ती आईच असते. मात्र, या गोष्टीची त्या मुलींना काहीच किंमत नव्हती. त्यांनी पुन्हा हत्येचा कट रचला आणि आईला भोसकून तसेच गोळ्या घालून ठार मारले. कोर्टात यापैकी एका मुलीला प्रौढ तर एकीला अल्पवयीन म्हणून वागणूक दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...