आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या दिवशी जमावाचा अल्पसंख्याक कुटुंबावर हल्ला; हॉकी, काठ्या आणि लोखंडी रॉडने घरात घुसून मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - हरियाणातील गुरुग्राम येथे 40 जणांच्या जमावाने एका अल्पसंख्याक कुटुंबाच्या घरात घुसून हल्ला केला. ही घटना गुरुवारी होळीच्या सेलिब्रेशनच्या दिवशी घडली. कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, त्यातील अनेक जण दारुच्या नशेत होते. सुरुवातीला त्यांनी घरातील पुरुषांवर रस्त्यावर हल्ला केला. जमाव वाढत असल्याने घाबरून पीडित कुटुंबीय घरात आले, तेव्हा त्यांच्यामागे जमाव सुद्धा काठ्या, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स घेऊन घरात घुसले. या भांडणात महिला मध्ये पडल्या तेव्हा जमावाने त्यांना सुद्धा धक्काबुक्की करून मारहाण सुरूच ठेवली. त्यातही 40 जणांचा घोळका घरात घुसून हल्ला करत असताना कॉलनीतील इतर लोक पीडितांच्या घरावर दगडफेक करत होता. या संपूर्ण घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

 

ये विडीओ देखिए। हमारे कौन से ग्रंथ में लिखा है मुसलमानों को मारो? गीता में? रामायण में? हनुमान चालिसा में?

ये लोग हिंदू नहीं हैं, हिंदुओं के वेष में गुंडे हैं। इनकी पार्टी लुच्चे, लफ़ंगे, गुंडों की फ़ौज है। इनसे देश और हिंदू धर्म दोनों को बचाना हर भारतवासी का फ़र्ज़ है https://t.co/NkFMZOBZkF

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 23, 2019

क्रिकेट आणि होळीवरून झाला होता वाद, 6 जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुग्रामच्या भूप सिंग नगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी कुटुंबातील काही मुले आणि तरुण गल्लीत क्रिकेट खेळत होते. याच दरम्यान कॉलनीत रंगांची उधळण सुरू होती. पीडितांपैकी एक साजीदने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, क्रिकेट खेळत असताना नशेत तर्र असलेल्या 7 जणांचा एका ग्रुप त्यांच्याकडे आला आणि धमकावून खेळ थांबवण्यास सांगितले. साजीद आणि त्याच्या भावंडांनी यास नकार दिला तेव्हा त्यांनी अचानक मारहाण सुरू केली. पाहता-पाहता गल्लीत जवळपास 40 जणांचा जमाव काठ्या, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स घेऊन आले. साजीद आणि त्याच्या भावंडांनी घाबरून घरात धाव घेतली. तेव्हा सगळेच त्यांच्या मागे घरात घुसले आणि बेदम मारहाण केली. सहाय्याक पोलिस आयुक्त शमशेर सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, या प्रकरणात 6 जणांना अटक अटक करण्यात आली आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...