आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सोशल मीडियावर आपले वडील विक्रमादित्य राजपूत यांच्यासोबतचे काही फोटोज शेअर केले आहे. हे फोटोज तिच्या लग्नातील आहेत. हे फोटो पहिल्यांदाच मीडियात आले आहेत. मीराने हे फोटोज शेअर करुन वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. मीराने लिहिले की, "पापाच्या 60 व्या वाढदिवशी शुभेच्छा. आम्ही तुमच्याकडून प्रेम, प्रार्थना, उत्कृष्ठता आणि आयुष्य जगणे शिकले आहे." काही फोटोजमध्ये बाप-लेकीची जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळतेय. एका फोटोमध्ये मीरा शाहिद कपूरसोबत वडिलांचे पाय पडताना दिसतेय. तर एका फोटोमध्ये मीरा-शाहिदची लेक मीशा अजोबांसोबत खेळताना दिसतेय. हे फोटोज पहिल्यांदाच मीडियामध्ये आले आहेत.
शाहिदला पहिल्यांदाच बघून घाबरले होते सासरे
- शाहिदने एकदा सांगितले होते की, "मी आणि मीरा कधी डेटवर गेलो नाही. आम्ही फक्त तीन-चार वेळा भेटलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी मीराला पहिल्यांदा भेटलो तेव्हा उडता पंजाब चित्रपटाच्या तयारीत होतो. मला आठवते की, मी दिल्ली येथील फार्महाउसवर तिल्या पहिल्यांदा भेटायला गेलो होतो, मी टॉमी(उडदा पंजाबमधील भूमिका) जोन(वाढलेले केस, पोनीटेल वीयर्ड शूज, टॅटूज) मध्ये होतो. मीराच्या वडिलांनी माझे स्वागत करण्यासाठी दार उघडले आणि ते थोडे घाबरले, ते म्हणाले की, अरे देवा... माझी मुलगी तुझ्यासोबत लग्न करेल?"
- मीरा आणि शाहिदने जुलै 2015 मध्ये अरेंज मॅरेज केले होते. लग्नाच्या वेळी शाहिद 34 वर्षांता होता तर मीरा 21 वर्षांची होती. म्हणजे मीरा शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. मीराला तिच्या मोठ्या बहिणीने या लग्नासाठी तयार केले होते. शाहिदनेही तयार केले होते. मोठी बहिण आणि शाहिदच्या मेहनतीनंतर मीरा लग्नासाठी तयार झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.