आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शाहिद कपूरने केले होते पहिल्यांदा चित्रपटात काम, तेव्हा अवघ्या 3 वर्षांची होती त्याची पत्नी मीरा राजपूत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत 24 वर्षांची झाली आहे. 7 सप्टेंबर 1994 रोजी दिल्लीत मीराचा जन्म झाला. विशेष म्हणझे जेव्हा शाहिदने पहिल्यांदा चित्रपटात काम केले होते, तेव्हा मीरा अवघ्या तीन वर्षांची होती. आम्ही बोलतोय ते शाहिदचा पहिला चित्रपट 'दिल तो पागल है' विषयी. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील एका गाण्यात शाहिदने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. त्यावेळी तो 16 वर्षांचा होता. त्यानंतर शाहिद 'ताल' (1999) मध्येही बॅकग्राउंड डान्सर म्हणून झळकला होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या चार वर्षांनी त्याचा लीड अॅक्टर म्हणून 'इश्क विश्क' हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अमृता राव आणि शहनाज ट्रेजरीवालासोबत शाहिद रोमान्स करताना दिसला होता.


तीन वर्षांपूर्वी झाले शाहिद-मीराचे लग्न.. 
- मीरा राजपूतने तीन वर्षांपूर्वी शाहिद कपूरसोबत लग्न थाटले. दोघांचे अरेंज मॅरेज असून त्यांचे लग्न दिल्लीतील छतरपूरच्या एका फार्महाऊसमध्ये झाले होते. शाहिद आणि मीराची भेट राधा स्वामी सत्संग ब्यास यांच्या माध्यमातून झाली होती. शाहिद आणि त्याचे वडील पंकज कपूर या ग्रुपला फॉलो करतात. तर मीराचे कुटुंबीयदेखील यांचे फॉलोअर्स आहेत. ज्यावेळी मीरा आणि शाहिदची भेट झाली, त्याकाळात शाहिद 'उडता पंजाब' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. स्वतः शाहिदने एका मुलाखतीत सांगितले होते की, या चित्रपटातील टॉमी या व्यक्तिरेखेसाठी त्याने केस वाढवले होते. तेव्हा लग्नात केस कापावे लागतील, ही अट मीराने त्याच्यासमोर ठेवली होती. 

 

आता दोन मुलांची आई आहे मीरा...   
- लग्नाच्या तीन वर्षांनी मीरा दोन मुलांची आई झाली आहे. तिची मुलगी मीशाचा जन्म 26 ऑगस्ट 2016 रोजी झाला. तर 5 सप्टेंबर 2018  रोजी तिने गोंडस मुलाला जन्म दिला. 


संगीताची शौकिन आहे मीरा...

- लेडी श्रीराम कॉलेज, नवी दिल्ली येथून इंग्लिश ऑनर्समध्ये पदवी प्राप्त करणा-या मीराचे शालेय शिक्षण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून झाले. मीराला संगीताची विशेष आवड आहे. आणि बॉलिवूड गायकांव्यतिरिक्त ती अवरिल लाविंगे, ब्योंस आणि डेमी लोवाटो सह अनेक विदेशी सिंगर्सची फॅन आहे. मीराने एका ब्युटी प्रॉडक्टच्या जाहिरातीतही काम केले आहे. शाहिदविषयी सांगायचे झाल्यास त्याचा आगामी 'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट येत्या 21 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय.  

बातम्या आणखी आहेत...