गर्भात असताना बाळाच्या छातीवर दिसली विचित्र गोष्ट; शरीराबाहेर होते हृदय, मग घडला चमत्कार
या आजाराला एक्टोपिया कॉर्डिस असे म्हटले जाते.
-
लंडन - इंग्लंडच्या लायसेस्टर शहरात एका गर्भवती महिलेच्या कंडीशनने डॉक्टरही गोंधळात सापडले. नाओमी फिंडले नावाची एक गर्भवती महिला रुटीन चेक-अपसाठी रुग्णालयात पोहोचली होती. डॉक्टरांनी तिच्यावर चाचण्या घेतल्या आणि सीटी स्कॅन केले. यात त्यांना जी गोष्ट दिसली ती धक्कादायक होती. महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या छातीवर एक विचित्र गोष्ट होती. आणखी काही चाचण्या घेतल्या असत्या बाळाचे हृदय त्याच्या शरीराबाहेर असल्याचा पत्ता लागला.
> डिलिव्हरी करण्यापूर्वीच डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये ही गोष्ट समजली. या आजाराला एक्टोपिया कॉर्डिस असे म्हटले जाते. डॉक्टरांनी जेव्हा सीटी स्कॅन घेतला तेव्हा बाळ आपल्याच हृदयासोबत खेळत होते. डॉक्टरांना सुद्धा ती जिवंत राहील याची अपेक्षा नव्हती. ब्रिटनमध्ये आतापर्यंत या अवस्थेतील एकही बाळ जिवंत वाचलेले नव्हते. परंतु, हे अर्भक खरोखर अपवाद ठरले. तरीही आई-वडिलांनी विश्वास सोडला नाही. महिलेने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव वेनेलोप असे ठेवले.
> जन्माच्या वेळी तिचे वजन फक्त 1.5 किलो होते. अतिशय नाजूक असलेल्या या बाळावर 50 डॉक्टरांनी उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या. तिच्या छातीमध्ये हृदय परत टाकण्यासाठी जागा तयार केली. कित्येक दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर तो हृदय योग्य ठिकाणी बसवला. हृदय पुन्हा शरीराबाहेर येऊन नये यासाठी डॉक्टरांनी त्याभोवती एक कवच तयार केले आहे. या दरम्यान मुलगी कित्येक वेळा गंभीर झाली. वर्षभर डॉक्टरांच्या टीमने उपचार करत तिला वाचवले. अशा अवस्थेतही जिवंत राहिलेली ती ब्रिटनची पहिलीच मुलगी ठरली आहे.
-
-
-
-
More From Khabrein jara hat ke News
- नाक टोचून आल्यानंतर थांबवत नव्हते रक्त, मग आली ताप आणि दोन्ही पाय झाले निकामी; आता आयुष्यभर व्हीलचेअरवर
- ड्रग्स ओढण्यासाठी रिकाम्या घरात घुसला, आत पाहताच उतरली नशा! असा पळाला मागे वळून पाहण्याचेही झाले नाही धाडस
- मानवी अंगांचे लोणचे बनवून विकतो हा दुकानदार; हात, पायांसह महिलांचे अंगही उपलब्ध! सरकारने दिली परवानगी