आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Miracle Mum Brings Premature Baby Son Back To Life With Two Hours Of Loving Cuddles After Doctors Pronounce Him Dead

जन्माला आले प्री-मॅच्योर बाळ, 20 मिनिटांनी झाला मृत्यू, आईने केले असे की, परत आले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी. ऑस्ट्रेलियामध्ये काही वर्षांपुर्वी एका महिलेने प्री-मॅच्योर डिलिवरीनंतर एका बाळाला जन्म दिला. जन्माच्या 20 मिनिटांनंतरच त्याचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी मुलाचे पार्थिव आईला दिले. तिने 2 तास बाळाला कुशीत ठेवले. नंतर तो अचानक जिवंत झाला. यावेळी आईने बाळाला दूधही पाजले होते. बाळ ज्या कारणांमुळे जिवंत झाले, त्याला कंगारु केयर टेक्निक म्हटले जाते.


प्रीमॅच्योर झाले होते बाळ
- ही घटना 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात घडली होती. येथे राहणा-या डेव्हिडची पत्नी कॅट ऑगने 3 तास लेबर पेन सहन केल्यानंतर एका मुलाला जन्म दिला होता.
- हे बाळ 27 आठवड्यांच्या प्रेग्नेंसीनंतर(6 महिने) झाले होते. प्री-मेच्योर असल्यामुळे तो खुप कमजोर होता आणि जन्मानंतर त्याचे वजन 1 किलोपेक्षाही कमी होते. मुलाची स्थिती खुप गंभीर होती.
- डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करुनही अवघ्या 20 मिनिटात बाळाचा श्वास बंद झाला. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. यानंतर डॉक्टरांनी बाळाची बॉडी आईकडे सोपविली.
- महिलेनुसार, जेव्हा त्यांनी मला बाळाची बॉडी दिली, तेव्हा मी त्यांना सांगितले की, आम्ही बाळाचे नाव जॅमी ठेवले होते. यानंतर डॉक्टरांनी महिलेला मुलाला स्किन-टू-स्किन केअर म्हणजेच कंगारु केअर देण्यास सांगितले.

 

केटने असे वाचवले बाळाचे प्राण
- महिलेने सांगितले, बाळाची बॉडी मिळताच मी पहिले माझा गाउन दूर केला आणि नंतर मुलाचे ब्लँकेट काढून त्याला कुशीत घेतले. यानंतर मी सतत त्याच्याशी बोलत राहिले. 
- 'बोलत असताना मी त्याला थापडले आणि त्याच्यावर प्रेमही केले. त्या दरम्यान मी त्याला माझ्या बोटाने दूध पाजले तेव्हा त्याने ते पिले आणि अचानक त्याने श्वास घ्यायला सुरुवात केली.'
- थोडावेळानंतर त्याने डोळे उघडले, हे एका चमत्काराप्रमाणे होते. तो आपले डोके फिरवत होता. यानंतर त्याने माझा बोट पकडला. हे सर्व पाहून डॉक्टरांनाही विश्वास बसत नव्हता.
- महिलेने या सर्व गोष्टी टीव्ही इंटरव्ह्यू दरम्यान सांगितल्या. त्यावेळी जेमी 5 महिन्यांचा झाला होता आणि पुर्णपणे ठिक होता.
- या मुलाखती दरम्यान केटचे हसबंड डेविड म्हणाले की, नशीबाने मला खुप समजुतदार आणि स्ट्राँग पत्नी मिळाली आहे. तिने खुप सहजरित्या ते सर्व केले. तिने असे केले नसते तर आज जेमी जिवंत नसता.

 

कंगारु टेक्निने वाचवले प्राण
- सामान्यतः जन्मानंतर बाळाची स्थिती गंभीर असल्यावर डॉक्टर त्यांना ICU मध्ये पाठवतात. परंतु सिडनी हॉस्पिटल्चाय डॉक्टरांनी कंगारु केअर टेक्निकचा वापर करुन बाळाचे प्राण वाचवले.
- कंगारु आई आपल्या बाळाला शरीराच्या पुढच्या भागत असलेल्या पिशवीत ठेवते. यामुळे बाळाला ऊब मिळते. यासोबतच आईकडून मिळणा-या टच थेरेपीच्या मदतीने बाळ अॅक्टिव्ह राहते. याच टेक्निकच्या आधारावर त्याला 'कंगारु केअर' म्हटले जाते.
- ही टेक्निक टच थेरेपीवर काम करते. बाळाला मिठीत घेतल्याने त्याच्या शरीराचे तापमान जलद वाढते आणि हायटेक इन्क्यूबेटरच्या तुलने खुप गतीने होते.
- मेडिकल रिसर्चनुसार बाळाच्या शरीरातील उष्णता कमी झाल्यावर त्याला वाचवण्यासाठी कंगारु केअरपेक्षा जास्त सुरक्षित आणि नैसर्गिक पध्दत कोणतीही नाही.
 

बातम्या आणखी आहेत...