आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : न‘गर’सेवक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‘सेवक’ होण्यासारखे
किती उमेदवार असतील
बघा एकदा तपासून
सगळे गुत्तेदार दिसतील !
नगराची सेवा कमी
त्यांची गुत्तेदारीच जास्त
महानगराचा ‘गर’ खाऊन
ते नगरचं करतात फस्त !!
त्यांच्या हाती नगराचं
भवितव्य असंच असेल
खड्डेविरहित असा
एकही रस्ता नसेल !!!