आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाच्या छतावर गैरप्रकार; महिलाही ताब्यात, कारवाई नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सापडलेल्या दारूच्या बाटल्या,अन्य साहित्य. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सापडलेल्या दारूच्या बाटल्या,अन्य साहित्य.

बीड : जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सहाच्या छतावरून एका महिलेसह दोन पुरुषांना रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता चौकशी केल्याचे सांगून या आंबटशौकिनांना सोडून दिले. एका सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर गैरप्रकार होत असतानाही कुठलीच कारवाई का केली गेली नाही, रुग्णालय प्रशासनालाही याची माहिती का दिली नाही हे प्रश्न अनुत्तरित अाहेत.


जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा कुचकामी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वाहन चोरी असो की चोऱ्यांच्या घटना सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. रुग्ण, नातेवाइकांना पास देण्यात येत नसल्याने नेमका कोणता व्यक्ती कशासाठी रुग्णालयात आला हेही माहिती नसते. अशातच सोमवारी पहाटे वॉर्ड क्रमांक ६ च्या छतावर काही महिला व पुरुष असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली, त्यांनी जाऊन पाहणी केली व पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी येऊन एका महिलेसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले. या वेळी छतावर दारूच्या बाटल्या व इतर साहित्यही आढळले. मात्र, या लोकांबाबत तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

तक्रार नसल्याने सोडले
रुग्णालयातून फोन आल्यानंतर शहर पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले होते. महिलेने कोणतीही तक्रार न दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले. - घनश्याम अंतराप, एपीआय, बीड शहर ठाणे.