आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: कथावाचक साध्वीवर बलात्कार, परिचिताने चहात गुंगीचे औषध मिसळून केले बेशुद्ध, रेप करून फरार झाला नराधम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मिसरोद परिसरात एका साध्वीवर त्यांच्याच परिचिताने बलात्कार केला. आरोपीने चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून रेप केला. पीडितेने 2 महिन्यांनंतर मिसरोद पोलिस स्टेशनला पोहोचून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


साध्वीचा मिसरोद परिसरात आश्रम आहे. त्याच त्याच्या प्रमुख आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 22 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता त्यांचा परिचित जसपालसिंह घरी आला. त्याच्या आग्रहावरून त्यांनी चहा बनवून आणला. त्यानंतर त्या बिस्किटे आणण्यासाठी गेल्या. परतल्यानंतर त्यांनी एकत्र चहा घेतला. परंतु काही वेळातच त्यांची शुद्ध हरपू लागली. याचाच फायदा उचलून आरोपीने कुकृत्य केले. बलात्कारानंतर आरोपीने कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.

 

गुरूजवळ मेरठमध्ये गेली साध्वी
घटनेनंतर महिला आपल्या गुरूकडे मेरठला निघून गेली. येथे गुरूशी बोलून त्यांनी पूर्ण घटनेबाबत सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून गुरुवारी भोपाळला परतल्यानंतर त्यांनी मिसरोद पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस सध्या फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.

 

काय म्हणतात पोलिस?
मिसरोदचे पोलिस अधिकारी संजीव चौकसे म्हणाले की, होशंगाबाद रोडवरील एका पॉश कॉलनीत साध्वीचा आश्रम आहे. यात 40 वर्षीय साध्वी आपल्या शिष्यांसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी मिसरोद परिसरात भागवत कथावाचनादरम्यान मंडीदीपच्या इंदिरानगरचा रहिवासी जयपालसिंह राजपूत याच्याशी त्यांची ओळख झाली होती. यानंतर तो साध्वींना कथास्थळी नेण्या-आणण्याचे काम करू लागला. तो त्यांना दीदी म्हणायचा.

 
बिस्किट घ्यायला गेल्या, तेव्हा चहात मिसळले औषध
चौकसे पुढे म्हणाले की, 22 जुलै रोजी जयपाल साध्वींच्या आश्रमात पोहोचला. त्याने चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. साध्वींनी चहा बनवून आणला आणि दोघेही पिऊ लागले. यादरम्यान जयपालने बिस्किट मागितले, म्हणून साध्वी बिस्किट आणण्यासाठी गेल्या. तेवढ्यात आरोपीने त्यांच्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले. ते प्यायल्यानंतर साध्वी बेशुद्ध झाल्या. जयपालने याचा फायदा उचलून साध्वीवर बलात्कार केला आणि पळून गेला. शुद्धीवर येताच साध्वीने जेव्हा आरोपीला फोन केला तेव्हा त्याने धमकी दिली.

 

जिवे मारण्याची दिली धमकी
आरोपीने 3 ऑगस्ट रोजी आश्रमात येऊन धमकावले. साध्वीने पोलिसांना सांगितले की, मी जयपालची पोलिसांत तक्रार करणार असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो 3 ऑगस्ट रोजी आश्रमात येऊन धडकला. येथे शिवीगाळ करत आपली लायसेन्सी पिस्तूल दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. टीआय चौकसे म्हणाले की, जयपालच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...