Home | National | Other State | Misdeed With 7 Year Old Minor Girl Murderer Broken Twelve Bones Of Her Body in Kannauj

नदीत तरंगतान दिसला 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, अमामुष्यतेची हद्द पार करत तोडली 12 हाडं आणि शरीरावर दिसले अनेक जखमांचे निशान...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 02:30 PM IST

मंदीरात वाजत असलेल्या डीजेच्या आवाजात दबला चिमुकलीचा आवाज.

  • Misdeed With 7 Year Old Minor Girl Murderer Broken Twelve Bones Of Her Body in Kannauj

    कन्नौज(उत्तर प्रदेश)- येथील अमरौली गावात 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि खूनाचे प्रकरण समोर आले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार मुलीच्या शरीरातील 12 पेक्षा जास्त हाडं मोडली आहेत, तसेच गुप्तांगासह शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निशान आहेत. आरोपीन दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुल केले.

    पोलिसांकडून मिळालेल्या मिहीतनुसार, घटना 8 एप्रिलची आहे. मागील सोमवारी चिमुकली आपल्या घरातून काही लोकांसोबत रात्री 7.30 वाजता मंदिरला जाण्यासाठी निघाली. खूप वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, पण मुलगी सापडली नाही. त्यानंतर 9 एप्रिलला त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.


    पोलिस अधिकारी विनोद मिश्रा यांना गावातील दोन मुलांनी सगळा प्रकार सांगितला. त्यानुसार 30 वर्षीय देवेंद्र कश्यप चिमुकलीला शॉलमध्ये गुंडाळून घेऊन गेला. पोलिसांनी आरोपी देवेंद्रला ताब्यात घेतले. गुरूवारी पोलिस आरोपीसोबत घटनास्थळी पोहचले आणि तलावातून मुलीचा मृतदेह बाहेर काढला.


    आरोपीने पोलिसांना सांगितले की, गावाबाहेरील मंदिरात खेळत असलेल्या मुलीला लालुच दाखवून तो घेऊन गेला. चिमुकली रडू लागली पण मंदिरमध्ये वाजत असलेल्या डीजेच्या आवाजात तिचा आवाज दबला गेला. त्यानंतर त्याने मुलीला मारून तिचा मृतदेह 1.5 किमी दूर काली नदीमध्ये फेकला.

Trending