आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड फेकून तरुणीवर केला बलात्कार, मध्यरात्री अर्धमेल्या अवस्थेत फेकले रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवास (एमपी) - देवास जिल्ह्यातील किटखेडी येथे एका युवकाने तरुणीसोबत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने विरोध केल्यावर आरोपीने तिच्यावर अॅसिड फेकले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. अशा अवस्थेतच नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी रात्री गावातील 17 वर्षीय तरुणी घरापासुन काही अंतरावर असलेल्या दुकानावर आई-वडिलांकडे जात होती. वाटेतच लोकेश प्रजापत आणि गोविंद या दोघांनी जबरदस्तीने तिला गाडीवर बसवून लोकेशच्या घरी नेले. तेथेच लोकेशने पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.  

 

बलात्कार केल्यानंतर फेकले रस्त्यावर 
मुलाने विरोध केल्यानंतर लोकेशने तिच्या अंगावर अॅसिड टाकले. यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. जखमी अवस्थेतच लोकेशने तिच्यावर बलात्कार केल्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला अर्ध्यारात्री रस्त्यावर फेकून पळ काढला.

 

रविवारी दाखल केला गुन्हा
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रजलाल नामक व्यक्तीने किशोरवयीन मुलीला जखमी अवस्थेत पाहिल्यावर तिच्या कुटुंबास कळवले. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी तिला इंदूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 11 नोव्हेंबर रोजी पीडितेच्या परिवाराने सतवास पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी आणि त्याच्या साथिदारांचा कसुन शोध घेत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...